पाटीलवाडी कृषि पर्यटनास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रक्षेत्र भेट...
शुक्रवार, 24 जनवरी 2025
Comment
मथाडी/चांदोरी :- अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अड्याळ ता. पवनी, जि. भंडारा , आज दिनांक 22/01/2025 ला मौजा मथाडी/चांदोरी येथे अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालयाच्या विद्यार्थी व विद्यार्थीनींनी पाटीलवाडी कृषि पर्यटन, येथे भेट देऊन मत्स्य शेती, फळबाग शेती,भाजीपाला लागवड इत्यादी विषय प्रत्यक्ष पाहणी करुन विविध पिकाविषयी सखोल मार्गदर्शन करुन प्रत्यक्ष प्रात्यक्षिकाद्वारे हास्विण्यात आले.
यावेळी प्रमुख मार्गदर्शक गणेश शेंडे, अजय खंडाईत, सतीश वैरागडे, गोपाल मेश्राम,(कृषि विभागाचे अधिकारी) होते.
अशोक मोहरकर कला व वाणिज्य महाविद्यालय, अड्याळ येथील प्राचार्य किशोर हुकरे,प्रा. आशा खंडाईत,डॉ. प्रा. विद्या ठाकूर ई. हजर होते.
0 Response to "पाटीलवाडी कृषि पर्यटनास महाविद्यालयीन विद्यार्थ्यांची प्रक्षेत्र भेट... "
एक टिप्पणी भेजें