
मंत्रालयातील कक्ष अधिकारी जयसेन इंगोले यांची अवर सचिवपदी पदोन्नती...!
परभणी : मुंबई येथे मंत्रालयात गृह विभागात कार्यरत असलेले कक्ष अधिकारी जयसेन जयप्रकाश इंगोले यांना अवर सचिवपदी पदोन्नती मिळाली आहे. हिंगोली जिल्ह्याच्या कळमनुरी तालुक्यातील डिग्रस कोंढुर येथील मूळ रहिवासी आणि परभणीत गेल्या अनेक वर्षापासून वास्तव्य असलेले आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते जयप्रकाश इंगोले यांचे चिरंजीव जयसेन इंगोले यांचे शालेय शिक्षण परभणीत झाले. मराठवाडा प्राथमिक शाळा, मराठवाडा हायस्कूल व बाल विद्या मंदिर हायस्कुलमध्ये शालेय शिक्षण झाल्यानंतर त्यांनी अकरावी व बारावी सायन्सचे शिक्षण श्री शिवाजी महाविद्यालयात घेतले. त्यानंतर अमरावती येथील शासकीय तंत्रनिकेतनमधून अभियांत्रिकीची पदविका पूर्ण केली. दरम्यान, छत्रपती संभाजीनगर येथे कंपनीमध्ये नोकरीवर असल्याने त्यांनी नाशिकच्या यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठातून पदवी संपादन केली. महाराष्ट्र राज्य लोकसेवा आयोगामार्फत त्यांची प्रथम नियुक्ती २०१३ मध्ये राज्य कर निरीक्षक, मुंबई या पदावर झाली. २०१६ साली कक्ष अधिकारी गट ब पदावर एम.पी. एस.सी.द्वारे नियुक्ती करण्यात आली. ऑगस्ट २०१७ मध्ये नागपुर येथे प्रशिक्षण घेतले. जून २०१९ पासून ते मंत्रालयात गृह विभागात कक्ष अधिकारी पदावर कार्यरत आहेत. दि.२२ मे २०२५ रोजी त्यांची अवर सचिव गट-अ पदावर पदोन्नती झाली आहे. झी मराठी वाहिनीचे जनसंपर्क अधिकारी तथा कलर्स मराठीचे माजी एक्झिक्युटिव प्रोडूसर कपिल इंगोले यांचे जयसेन हे मोते बंध आहेत
0 Response to "मंत्रालयातील कक्ष अधिकारी जयसेन इंगोले यांची अवर सचिवपदी पदोन्नती...! "
एक टिप्पणी भेजें