-->

Happy Diwali

Happy Diwali
विहीरीचे पाणी दूषित ; महिला जमल्या चौकात तलाव वार्ड साकोलीतील प्रकार

विहीरीचे पाणी दूषित ; महिला जमल्या चौकात तलाव वार्ड साकोलीतील प्रकार


संजीव भांबोरे
भंडारा :- साकोली शहरातील श्री विश्वकर्मा मंदिर चौकातील विहीरीचे पाणी दूषित झाले. अचानक परीसरातील महिला चौकात जमल्या होत्या. महिलांनी फ्रिडमचे अध्यक्ष किशोर बावणे यांना बोलविले आणि ही गंभीर बाब नगरपरिषदेच्या लक्षात आणून देत पिण्याच्या पाण्याची समस्या दूर करण्यासाठी मागणी केली आहे. 
           तलाव जवळील श्री विश्वकर्मा मंदिर जवळील मुख्य विहीरीतून तलाव वार्ड व गणेश वार्ड येथील सुमारे पाचशेच्या वर महिला पुरुष पिण्याचे पाणी ओढतात. दोन दिवसांपासून नळ अधामधात येत आहे. अचानक या विहीरीचे पाणी दूषित झाले. ( शुक्रवार २५ जुलै ) ला सायं. ०५:३० ला महिला पाणी भरण्यासाठी आले असता संपूर्ण गढूळ पाणी दिसून आले. यातच महिलांनी स्थानिक फ्रिडम युथ फाऊंडेशन अध्यक्ष किशोर बावणे यांना बोलविले. आणि त्यांकडे मागणी केली की, हा प्रकार नगरपरिषदेच्या समोर आणून तातडीने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी. काही दिवसांपूर्वी नगरपरिषदेने विहीरीत ब्लिचिंग पावडर टाकले परंतु आता अजूनच पाणी गढूळ झाले आहे. परीसरातील ही पाण्याची समस्या तातडीने दूर करावी अशी मागणी करण्यात आली. 
          याप्रसंगी महिला गोदावरी बोरकर, कविता बावणे, गिता बोरकर, शर्मिष्ठा बोरकर, लता द्रुगकर, मनिषा तिडके, माला रंगारी, छाया रंगारी, अर्चना रंगारी, मनिषा भैसारे, मंदाकिनी डोमळे, शांता देशमुख, योगिता चौधरी, अंतकला बोरकर, शकुंतला तिडके, अनिल बोरकर, अनिल तिडके, गुड्डू बोरकर, सूरज पुस्तोडे यांसह दोन्ही वार्डातील महिला पुरुष या विहीरीजवळ जमले होते.

0 Response to "विहीरीचे पाणी दूषित ; महिला जमल्या चौकात तलाव वार्ड साकोलीतील प्रकार "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article