-->
भडांरा बायपास रोड चे लोकार्पण

भडांरा बायपास रोड चे लोकार्पण

दिगंबर देशभ्रतार

भडांरा :- राष्ट्रीय महामार्ग 53 वरील बांधण्यात आलेल्या भंडारा बायपास मार्गाचे  लोकार्पण आज भंडारा येथे आयोजित एका सोहळ्याद्वारा केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. भंडारा जिल्ह्यातील तुमसर ते बपेरा व खापा ते भंडारा व मानेगाव लाखणी येथील ओव्हरपास या रस्त्यांचे भूमिपूजन नितीनजी गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले.

जिल्ह्यात समृद्धी, संपन्नता यावी हा आमचा प्रयत्न आहे. उपलब्ध असलेल्या कच्च्या मनावर आधारित उद्योग उभे झाल्यास त्या माध्यमातून रोजगार मिळेल. महामार्ग हे या औद्योगिक विकासासाठी पोषक ठरतात. नवीन झालेला बायपास मार्ग आणि येत्या तीन महिन्यात काम सुरू होणार. नागपूर ते भंडारा सहा पदरी मार्ग जिल्ह्याच्या विकासाचा महत्त्वाचा कणा ठरेल असे मत केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीनजी गडकरी यांनी व्यक्त केले.

व्यासपीठावर सर्वश्री उल्हास फडके, वीरेंद्र अंजनकर, खा. प्रशांत पडोळे, आ. परिणय फुके, आ. संजय पुराम,  आमदार राजू कारेमोरे, आ.नरेंद्र भोंडेकर,  भाजपा जिल्हाध्यक्ष सौ.  सीताता ई रहांगडाले, आशु  गोंडणे, माजी जिल्हाध्यक्ष प्रदीप पडोळे, सौ. रेखाताई भाजीपाले, कुंदा वैद्य, माला बगमारे, मंजिरी पनवेलकर, कल्याणी भूरे, प्रकाश बाळबुदे, शिवराम गिऱ्हेपुंजे, चैतन्य उमाळकर, मयूर बिसेन, विलास काटेखाये, विनोद बांते, प्रशांत खोब्रागडे, विजय लिचडे, संदीप मेश्राम, सचिन कुंभलकर, अनिल गायधने, जिल्हाधिकारी संजय कोलते, पोलीस अधीक्षक नूरुल  हसन, भास्कर माने व आदि उपस्थित होते. 

यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते सर्व प्रकल्पांचे लोकार्पण आणि भूमिपूजन डिजिटल पद्धतीने करण्यात आले. त्यापूर्वी नितीन गडकरी यांनी लोकार्पण करण्यात आलेल्या भंडारा बायपास मार्गाची प्रत्यक्ष प्रवास करून निरीक्षण केले आणि अधिकाऱ्यांकडून माहिती जाणून घेतली.

श्री नितीनजी गडकरी यांचे भंडारा जिल्ह्यावर कायमच प्रेम राहिले आहे असे सांगून काही मागण्या केल्या. विशेष करून आंबाडी ते अंभोरा हा बंद झालेला मार्ग पुन्हा सुरू होण्याच्या दृष्टीने निधीची तरतूद करून लोकांची होणारी गैरसोय दूर करावी अशी मागणी यावेळी नितीनजी गडकरी यांच्याकडे केली.

भंडारा शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या 9 किलोमीटरचे सिमेंट काँक्रीट चे काम  सुरू करून हा रस्ता ही लवकरच मोकळा श्वास घेईल असे गडकरी साहेब म्हणाले. जिल्हा समृद्ध झाला पाहिजे. त्यासाठी आजच्या घडीला रस्त्यांचे परिपूर्ण जाळे तयार झाले आहे. लोकप्रतिनिधींनी आता या दृष्टीने प्रयत्न करावेत असेही म्हणाले.



0 Response to "भडांरा बायपास रोड चे लोकार्पण"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article