-->
विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी युवा सेना – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आक्रमक.

विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी युवा सेना – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आक्रमक.

  • अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी उल्हासनगर व अंबरनाथ शहरातील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेट घेतली.  

सोनू संजीव क्षेत्रे (उल्हासनगर प्रतिनिधी)

उल्हासनगर :- महाराष्ट्र शासनाने मे २०२५ मध्ये शाळा सुरक्षेसंबंधी जारी केलेल्या कठोर मार्गदर्शक तत्त्वांची अंमलबजावणी उल्हासनगर व अंबरनाथ परिसरातील अनेक शाळांनी अद्याप केलेली नाही, हे गंभीर चिंतेचे विषय आहे. बदलापूरमधील दुर्घटनेनंतर शासनाने ही तत्त्वे जारी केली असून, विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी या नियमांचे पालन तातडीने करणे अनिवार्य आहे.  

माननीय आदित्य ठाकरे यांच्या आदेशानुसार व माननीय वरुण सरदेसाई यांच्या मार्गदर्शनाखाली, अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी राज प्रकाश महाडिक यांनी उल्हासनगर आणि अंबरनाथमधील प्रशासकीय अधिकाऱ्यांशी भेटून चर्चा केली आणि पत्राद्वारे तात्काळ कारवाईची मागणी केली आहे. यात खालील अधिकाऱ्यांना संबोधित करण्यात आले आहे: सहाय्यक आयुक्त, शिक्षण विभाग, उल्हासनगर महानगरपालिका; तहसीलदार कार्यालय, अंबरनाथ; मुख्य वाहतूक विभाग (उल्हासनगर व अंबरनाथ); मुख्य अग्निशमन दल (उल्हासनगर व अंबरनाथ).  

मुख्य मागण्या आणि कार्ययोजना:  

  1. कॅमेरा व GPS सिस्टम अनिवार्य: शाळेच्या संपूर्ण परिसरात किमान ३० दिवसांच्या व्हिडिओ स्टोरेजसह सीसीटीव्ही कॅमेरे स्थापित करणे. प्रत्येक बसमध्ये 360° CCTV कॅमेरे व रिअल-टाइम GPS ट्रॅकिंग. ३० दिवसांचा फुटेज सेव्ह करणे बंधनकारक.  
  2. अतिप्रवासी बसमधील विद्यार्थ्यांवर पूर्ण बंदी: बसच्या निर्धारित आसन क्षमतेपेक्षा जास्त विद्यार्थी बसवणे कायद्याने गुन्हा. RTO नियमांनुसार प्रत्येक आसनावर कमाल ३ लहान मुले किंवा २ मोठी मुलेच बसू शकतात.  
  3. विद्यार्थ्यांसाठी सल्ला सेवा: भावनिक ताण किंवा छळ यांना तोंड देत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी सक्तीची कौन्सेलिंग सत्रे आयोजित करणे.  
  4. कर्मचाऱ्यांची पूर्व-नियुक्ती तपासणी: सर्व शाळेतील कर्मचाऱ्यांची, ड्रायव्हर्स, परिचारिका व स्टाफसाठी पोलीस वेरिफिकेशन अनिवार्य. पोलिस-सत्यापित वैयक्तिक पार्श्वभूमी तपासणी, तसेच प्राथमिक ते सहावीच्या विद्यार्थ्यांसाठी महिला शिक्षकांना प्राधान्य देणे.  
  5. शाळा वाहतूक सुरक्षा: वाहतूक कर्मचाऱ्यांवर अचानक मद्यपान चाचण्या आणि प्रत्येक बसमध्ये महिला पर्यवेक्षकाची उपस्थिती अनिवार्य करणे.  
  6. तक्रार नोंदविण्याची यंत्रणा: विद्यार्थ्यांवर कोणत्याही प्रकारचा अत्याचार झाल्यास तातडीने पोलिस किंवा बालकल्याण पोलिस युनिटकडे नोंद करणे. ऑनलाइन आणि ऑफलाइन तक्रार पेटी – डिजिटल फॉर्म किंवा शाळेत लॉक केलेली भौतिक तक्रार पेटी उपलब्ध करून देणे.  
  7. जागरूकता कार्यक्रम: विद्यार्थ्यांना चांगला स्पर्श-वाईट स्पर्श शिकवणे, चिराग मोबाइल एप्लीकेशन प्रचार करणे आणि सखी सावित्री समित्या स्थापन करणे.  
  8. दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी विशेष काळजी: दिव्यांग विद्यार्थ्यांची स्वतंत्र नोंदणी ठेवणे.  
  9. समुदाय जागरूकता: बालविवाह आणि सायबर धोके याविरुद्ध मोहिमा राबवणे.  
  10. स्व-संरक्षण प्रशिक्षण: मुलींसाठी नियमित स्व-संरक्षण प्रशिक्षण आयोजित करणे.  
  11. हजेरी नोंदणी: विद्यार्थ्यांच्या उपस्थितीचे निरीक्षण करण्यासाठी दररोज तीन वेळा रोल कॉल घेणे.  
  12. प्रत्येक शैक्षणिक संस्थांमध्ये तसेच बसमध्ये फर्स्ट एड किट व फायर एक्स्टिंग्युशर अनिवार्य.  

राज प्रकाश महाडिक यांनी स्पष्ट सूचित केले आहे की: २४ तासांच्या आत सर्व शाळांना नियमांचे पालन करण्याची नोटीस जारी करणे. अचानक तपासण्या करून नियमभंग करणाऱ्या शाळांवर दंड/नोंदणी रद्द करणे. १५ दिवसांच्या आत कारवाईचा अहवाल जनतेसमोर मांडणे.  

"सुरक्षित विद्यार्थी, सुरक्षित महाराष्ट्र" — या घोषणेला उल्हासनगर-अंबरनाथमधील सर्व विद्यार्थी, पालक आणि समाजाने पाठिंबा द्यावा. तसेच ही केवळ प्रशासकीय बाब नसून, राज्याच्या भविष्याचा प्रश्न आहे. विद्यार्थी सुरक्षेला उपेक्षा केल्यास, युवा सेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) त्रिव निषेध आणि आंदोलन करणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.  

शिष्टमंडळातील प्रमुख उपस्थित नेते: अनिल भोईर (उपजिल्हाप्रमुख, कल्याण लोकसभा शिवसेना); राज प्रकाश महाडिक (अंबरनाथ विधानसभा युवासेना अधिकारी); अजय घोडके (विस्तारक, अकोला जिल्हा व उल्हासनगर उपशहर अधिकारी); महेश दुर्गुडे (अंबरनाथ शहर समन्वयक, युवासेना); संजीवनी सहसने (अंबरनाथ उपशहर अधिकारी, युवती सेना); प्रेम पाटील (उल्हासनगर उपविभाग अधिकारी); दीपक सासणे (शाखाप्रमुख, अंबरनाथ).

0 Response to "विद्यार्थी सुरक्षा मार्गदर्शक तत्त्वांच्या अंमलबजावणीसाठी युवा सेना – शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष) आक्रमक."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article