लाखनी पोलिसांकडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 3 लाख 6 हजाराचा रुपयाचा गुद्देमाल जप्त
गुरुवार, 7 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
''साप्ता जनता की आवाज"
भंडारा :- पोलीस स्टेशन लाखनी अंतर्गत आरोपी नामे योगराज सिताराम दोनोडे वय 48 वर्षे राहणार मेंढा पोहरा तालुका लाखनी जिल्हा भंडारा येथील फिर्यादी यांना गुप्त माहितीवरून आरोपी हा मौजा पिंपळगाव पिंपळगाव/ सडक येथे मिळून आल्याने त्याच्या ताब्यातील महेंद्रा कंपनीचा मॉडेल क्रमांक 415 डी.आय एल रंगाचा ट्रॅक्टर क्रमांक 36 झेड 83 71 किंमत 2,00000/रुपये, ट्रॅक्टरला जोडलेली विना क्रमांकाची लाभ रंगाची ट्रॅक्टर ट्रॉली किंमत1,00000/रुपये मध्ये अवैध रित्या नदी घाटातून बिना पास परवाना अंदाजे एक ब्रास रेती किंमत 6000/हजार रुपये ची चोरी करून शासनाचा महसूल बुडवून व पर्यावरणाची हानी करताना मिळून आल्याने त्याच्याकडून एकूण 3,06,000/रुपयाचा बुद्धिमान मिळून आल्याने फिर्यादीच्या लेखी रिपोर्टवरून आरोपीविरुद्ध अप क्रमांक 304 / 2025 कलम 303 /(2) भारतीय न्याय संहिता सह कलम 48 (8) महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 ,7 ,9 ,पर्यावरण संरक्षण अधिनियम 1986 नुसार अन्वये सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे .
सदरची कार्यवाही माननीय पोलीस अधीक्षक नुरूल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, पोलीस निरीक्षक पिसाळ, यांच्या मार्गदर्शनास सहायक पोलीस निरीक्षक साळवे ,यांनी केली असून सदर गुन्ह्याच्या तपास पोलीस स्टेशन लाखनीचे अधिकारी करीत आहेत.
0 Response to "लाखनी पोलिसांकडून अवैध रेती वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरवर कारवाई एकूण 3 लाख 6 हजाराचा रुपयाचा गुद्देमाल जप्त "
एक टिप्पणी भेजें