ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा घेतला आढावा• जि.प. अध्यक्षांनी केली विविध विभागाची पाहणी.
शनिवार, 2 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
अर्जुनी मोरगाव :- ग्रामीण भागातील आरोग्यसेवा प्रभावीपणे नागरिकांपर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा परिषद अध्यक्ष लायकराम भेंडारकर यांनी मंगळवारी (दि. 29) अचानक अर्जुनी मोरगाव येथील ग्रामीण रुग्णालयाला भेट दिली. त्यांनी रुग्णालयातील विविध सेवासुविधांचा सखोल आढावा घेत रुग्णांशी संवाद साधून उपचारासंदर्भातील अनुभव जाणून घेतले.
भेंडारकर यांनी रुग्णालयातील विविध वॉर्डात जाऊन रुग्णांची विचारपूस केली. वैद्यकीय सेवा वेळेवर व योग्यप्रकारे मिळणे, रुग्णालयाती स्वच्छता, औषधांचा साठा, डॉक्टर व नर्सिंग कर्मचारी वेळेवर उपस्थित असतात का? या सर्व बाबींची त्यांनी बारकाईने पाहणी केली. भेटीदरम्यान अस्वलाच्या हल्ल्यात गंभीर जखमी झालेले मोरगाव येथील शेतकरी मार्कंड सीताराम वलके व गिरीधारी मंगलमूर्ती शिवणकर या विद्यार्थ्यांला अपघातात गंभीर दुखापत झाल्याने त्या दोघांच्याही प्रकृतीची विचारणा केली. यावेळी वलके यांना त्वरित वनविभागाकडून मदतीसाठी
रुग्णांचे समाधान करा यावेळी रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. नंदा
गेडाम, डॉ. पवार, डॉ. कापगते, डॉ. गाईन, डॉ. पाल, डॉ. सीरसाम तसेच इतर वैद्यकीय व आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. भेटीदरम्यान ग्रामीण रुग्णालयात रुग्णांना दिल्या जाणाऱ्या सेवेबाबत त्यांनी समाधान व्यक्त केले. तसेच रुग्णालय प्रशासनाला कामकाजात अधिक पारदर्शकता आणण्याचे आणि रुग्णांचे समाधान सुनिश्चित करण्याच्या सूचना दिल्या.
वनविभागाच्या अधिकाऱ्यांशी फोनवर चर्चा करून सूचना दिल्या. यावेळी ते म्हणाले की, नागरिकांना दर्जेदार आरोग्य सेवा मिळणे प्रमुख उद्दिष्ट आहे. यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्याचे काम जिल्हा परिषद करीत आहे. रुग्णालयातील कमतरता लक्षात घेऊन तातडीने उपाययोजना करण्यात येतील
0 Response to "ग्रामीण रुग्णालयातील सुविधांचा घेतला आढावा• जि.प. अध्यक्षांनी केली विविध विभागाची पाहणी."
एक टिप्पणी भेजें