-->
सत्याचा विजय होणारच - सरपंच हर्षकुमार मोदी • सत्य आणि न्यायासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन

सत्याचा विजय होणारच - सरपंच हर्षकुमार मोदी • सत्य आणि न्यायासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन


संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज" 
गोंदिय :- सौंदड जि. गोंदिया येथील ठेकेदार असलेले उपसरपंच रोशन शिवणकर यांनी कोणतेही पुरावे समोर न ठेवता बिनबुडाचे व हवेत आरोप करून एक पारदर्शक असलेल्या सौंदड ग्रामपंचायतीची प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले गेले. यावर सौंदडकर जागृत जनतेपुढे सत्य स्थिती आणन्यासाठी ही "सत्य आणि न्यायासाठी" पत्रकार परिषदेचे आयोजन ( शनि. ०२ ऑगस्ट ) ला सडक अर्जूनी जवळ सावंगी येथील सभागृहात आयोजित करण्यात आली. याप्रसंगी या झालेल्या पत्रकार परिषदेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सुमारे शंभराहून मिडिया व वृत्तपत्र प्रतिनिधी हजर झाले होते. यामध्ये सर्व ग्रामपंचायत महिला पुरुष सदस्यांनी सुद्धा हे केलेले आरोप खोटे असल्याचे प्रतिपादन केले हे उल्लेखनीय. 
             सदर पत्रकार परिषदेला संबोधित करताना सौंदडचे कर्तव्यदक्ष सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी सांगितले की, येथील अगोदरच ठेकेदारी करणारे उपसरपंच रोशन शिवणकर यांनी माझ्या विरोधात काही लोकांना घेऊन विना पुराव्याने भ्रष्टाचाराचे, पांदण रस्त्यांवर अतिक्रमण केल्याचे, गैरव्यवहार केल्याचे तत्थ्यहिन आरोप केले. व ते सिध्द करू शकले नाही. यातच काही सोशल मिडीयातून त्यांनी फोटोंसह एडीट करून चुकीची माहिती प्रसारीत करून सौंदड वासियांची चक्क दिशाभूल केली आहे. यावर आम्ही या पारदर्शक व विकासमय सौंदड ग्रामपंचायतची बदनामी केल्याप्रकरणी त्यांच्यावर १ कोटींचा मानहानीचा दावा देखील करण्यात आला व डुग्गीपार पोलीस ठाणे येथे तक्रार दाखल करण्यात आली आहे. येथील जागृत जनतेला सर्व ठाऊक आहे की, सन २०१० पासून मी गोरगरीब जनतेसाठी जनसेवेचा ध्यास घेतला आहे. आमदार डॉ. परीणय फुके यांचे माध्यमातून १० लक्ष रुपयांचा विकासनिधी आणला. आज पूर्वीचे सौंदड कसे होते.? व आज कसे आहे. हे येथील जागृत जनतेचा सर्व माहिती आहे. परंतू ठेकेदारीत ग्रामपंचायतीचे काम न मिळाल्याने ठेकेदार उपसरपंच रोशन शिवणकर हे स्वतःला शेतकरी म्हणविणारे एक कमिशन लाटणारे व्यक्ती आहेत हे जनता जनार्दन यांना माहिती आहे. रोशन शिवणकर यांनी माझ्या राजकीय क्षेत्राची बदनामी करू पाहत आहेत. त्यात शुभम जनबंधू हे सुद्धा सामिल असून अवैध बेहिशेबी मालमत्ता आज यांकडे आली कुठून. मी आजपर्यंत केलेल्या प्रत्येक कामाचा लेखाजोखा हिशोब हा कागदोपत्री नोंद आहे. मी पदभार स्वीकारतात सांगितले होते की, "ठेकेदारी मुक्त सौंदड ग्रामपंचायत" मी बनविणार, मात्र उपसरपंच रोशन शिवणकर यांनी स्वतः ठेकेदारी केली. त्यातच कामात गैरव्यवहार करणे, निकृष्ट दर्जाचे काम करणे व वारंवार बिले काढणे अश्या प्रकारावर मी प्रतिबंध केला असता सुडबुद्धीने ग्रामपंचायतची स्वच्छ पारदर्शक प्रतिमा मलिन करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. अश्या खोट्या व्यक्तीच्या खोट्या व बनावट अफवांवर सौंदड ग्रामपंचायत वासियांनी लक्ष देऊ नये. जनतेस माझ्यावर आणि माझा येथील जनतेवर पूर्ण विश्वास आहे. आता सर्व बिनबुडाच्या आरोपांचे पितळ लवकरच उघडे पडणार असून उपसरपंच रोशन शिवणकर यांनी आपला राजीनामा माझ्याकडे तयार ठेवावा. कारण त्यांचा राजीनामा मीच स्विकारणार आहे. मला भारतीय न्याय व्यवस्थेवर पूर्ण विश्वास आहे. यामध्ये "सत्याचाच विजय" होणार आहे. आणि जनतेने सत्याला साथ देण्याचे आवाहन सुद्धा सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी झालेल्या पत्रकार परिषदेत केले आहे. 
          सदर पत्रकार परिषदेत जनसेवा परिवर्तन पॅनल अध्यक्ष संदीपकुमार मोदी, सौंदड ग्रामपंचायत महिला सदस्य अर्चना चन्ने, प्रमिला निर्वाण, सुषमा राऊत, कुंदा साखरे, पं. स. सदस्या वर्षा शहारे, ग्रामपंचायत सदस्य विजय चोपकर, भाऊराव यावलकर, खुशाल ब्राह्मणकर यांसह अनेक ग्रामस्थ येथे उपस्थित होते. सदर पत्रकार परिषदेला भंडारा गोंदिया जिल्ह्यातील सुमारे शंभराहून अधिक न्यूज मिडिया व वृत्तपत्र प्रतिनिधी हजर झाले होते. शेवटी सरपंच हर्ष विनोदकुमार मोदी यांनी सर्वांचे आभार मानून वक्तव्य केले की, आज या सत्य आणि न्यायासाठी आयोजन केलेल्या पत्रकार परिषदेला लोकशाहीचा चौथ्या स्तंभ पत्रकार बांधवांनी जी अफाट उपस्थिती दर्शविली तोच या सत्यासाठी झालेल्या विजयाची सुरूवात झाली आहे असे प्रतिपादन करीत सर्वांचे आभार मानले आहे.

0 Response to "सत्याचा विजय होणारच - सरपंच हर्षकुमार मोदी • सत्य आणि न्यायासाठी पत्रकार परिषदेचे आयोजन "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article