प्रवासी निवारा केव्हा तयार होणार ?
गुरुवार, 14 अगस्त 2025
Comment
कुलदिप गंधे "
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पहेला भंडारा पवनी मार्गावरील वाकेश्वर फाटा हा रावणवाडी मार्गावर पर्यटन स्थळ आहे. त्यामुळे मुटकुरे पेट्रोल पंप जवळ मुख्य चौक तयार झालेला असताना बसस्थानक निवारा तयार करण्यात यावा, अशी मागणी होत आहे. या मागणीकडे पुढाऱ्यांसह एसटी प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याने विद्यार्थ्यांसह प्रवाशांना पावसात उभे राहून एसटी बसची प्रतीक्षा करावी लागत आहे.
प्रवासी निवारा नसल्यामुळे महिला प्रवाशांची चांगलीच कोंडी होत आहे. वाकेश्वर फाटा येथे मुख्य प्रवासी निवारा केव्हा तयार होणार, असा संतप्त सवाल ग्राम वासीयांकडून केल्या जात आहे. भंडारा शहर तालुक्याचे व जिल्ह्याचे मुख्य ठिकाण असल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणासाठी एसटी बसने ये-जा करीत असतात. मात्र, प्रवासी निवाऱ्याअभावी चिमुकल्या विद्यार्थ्यांना तसेच प्रवाशांना मार्गाच्या कडेने उभे राहून बसची प्रतीक्षा करावी लागते. वाकेश्वर फाटा चौकात या ठिकाणी वाहनांची व प्रवाशांची मोठी वर्दळ असते. याच ठिकाणी पेट्रोल पंप, लॉज, रेस्टॉरंट, ढाबे व व्यापारी प्रतिष्ठान, असल्याने मोठी वर्दळ असल्यामुळे अपघाताची शक्यताही नाकारता येत नाही.
दररोज हजारो प्रवासी बसने प्रवास करीत असतात. मात्र, या प्रवाशांसाठी प्रवासी निवारा नसल्यामुळे प्रवाशांना मार्गाच्या कडेला उभे राहावे लागत आहे. एसटी बस ठरल्या ठिकाणी थांबत नसने प्रवाशांना धावत बस पकडावी लागते.
0 Response to "प्रवासी निवारा केव्हा तयार होणार ?"
एक टिप्पणी भेजें