-->
श्री संताजी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण

श्री संताजी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण

 नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
पालांदूर : स्थानिक श्री संताजी कला आणि विज्ञान महाविद्यालयात 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. महाविद्यालयातील ध्वजारोहणानंतर 'राष्ट्रीय सेवा योजना'  आणि सांस्कृतिक विभागाने संयुक्तपणे हा कार्यक्रम आयोजित केला. यामध्ये महाविद्यालयाचे असंख्य विद्यार्थी उत्साहाने सहभागी झाले होते.
महाविद्यालयाच्या परिसरातील रस्त्यांच्या कडेला विविध प्रकारची झाडे लावण्यात आली. या उपक्रमाचा मुख्य उद्देश पर्यावरणाचे संतुलन राखणे हा होता. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य डॉ. गिरीश लांजेवार यांच्या हस्ते वृक्षारोपणास सुरुवात झाली. या वेळी प्रत्येक प्राध्यापकाने एक वृक्ष लावून कार्यक्रमात सहभाग नोंदवला.
हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. रमेश बागडे, राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ. संजयकुमार निंबेकर, डॉ. राजेंद्र खंडाईत, डॉ. रवी पाटेकर, डॉ. नितीन थुल, प्रा. प्रमोद शेंडे, प्रा. मनोज मोहतुरे, श्री. महेश गुरखे, श्री. भरत घरडे, जहांदार बख्त आणि जयदेव ढवळे यांच्यासह श्रीकृष्ण बेदवार, अनिकेत ठवरे, अहिंसक खोब्रागडे, प्रणय वलथरे, कु. अश्विनी ठाकरे, प्रियंका खेडेकर, आणि लक्ष्मी भानारकर यांनी विशेष परिश्रम घेतले.

0 Response to "श्री संताजी महाविद्यालयात स्वातंत्र्यदिनी वृक्षारोपण"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article