भर पावसात भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा ज्वालामुखी!..•जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – शासनाला कठोर इशारा.....
गुरुवार, 14 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्रम
"साप्ताहिक"जनता की आवाज"
भंडारा :- दि. 13 ऑगस्ट — शेतकऱ्यांच्या हक्कांसाठी लढणारे रणशिंग आज भंडाऱ्यात जोरात वाजले!
शास्त्री चौक ते जिल्हाधिकारी कार्यालय असा भव्य आणि आक्रमक मोर्चा भर पावसात काढण्यात आला.
मोर्चाचे नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा. शशिकांत शिंदे, आमदार रोहितदादा पवार, ओबीसी मंडळ यात्रेचे प्रदेशाध्यक्ष राजा राजापूरकर आणि भंडाऱ्याचे किसानपुत्र चरणभाऊ वाघमारे यांनी.
पावसाच्या धारेला न जुमानता शेकडो शेतकरी व कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरत घोषणांचा वर्षाव केला.
सभेदरम्यान पावसाची जोरदार हजेरी लागूनही आंदोलनकर्त्यांची आक्रमकता आणि जोश द्विगुणित झाला.
शासनाच्या उदासीन भूमिकेवर जोरदार हल्ला चढवित शेतकऱ्यांच्या सर्व मागण्या तातडीने मान्य करण्याची मागणी करण्यात आली.
"हक्क मिळाल्याशिवाय शांत बसणार नाही!" असा इशारा आंदोलनस्थळावरून देण्यात आला.
आजचा मोर्चा केवळ पावसावर मात करणारा नव्हता, तर शासनाच्या निष्क्रियतेवर ठोकणारा होता.
भंडाऱ्याच्या रस्त्यांवरून निघालेल्या या रणशिंगामुळे सत्ता थरथर कापेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.....
0 Response to "भर पावसात भंडाऱ्यात शेतकऱ्यांचा ज्वालामुखी!..•जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा – शासनाला कठोर इशारा....."
एक टिप्पणी भेजें