उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाला युवासेना उ.बा.ठा गटाचा पूर्ण पाठिंबा. आंदोलनात सहभागी.
गुरुवार, 7 अगस्त 2025
 Comment 
  सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज" 
 राज प्रकाश महाडिक (अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी) यांनी  शिक्षक आंदोलकांची भेट घेऊन पक्षा तर्फे समर्थन पत्र दिले.
 उल्हासनगर :- उल्हासनगर, ७ ऑगस्ट २०२५: सेवा सदन ट्रस्टद्वारा चालवल्या जाणाऱ्या उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांवर अन्याय केला जात आहे, याविरुद्ध सुरू असलेल्या आंदोलनाला युवा सेनेने मोठ्या प्रमाणावर समर्थन दिले आहे. शिक्षकांच्या मागण्यांना पाठिंबा देण्यासाठी राज प्रकाश महाडिक यांनी युवा सेनेच्या शिष्टमंडळासह शिक्षक आंदोलकांची भेट घेऊन पक्षा तर्फे समर्थन पत्र दिले.
प्रमुख मागण्यांमध्ये १५ वर्षे निष्ठापूर्वक सेवा बजावलेल्या निलंबित शिक्षकांची तात्काळ पुनर्नियुक्ती, शाळा बंद करून जागा व्यावसायिक हेतूने विकण्याच्या ट्रस्टच्या योजनेवर प्रतिबंध, शिक्षण संचालक कार्यालयाद्वारे ट्रस्टविरुद्ध तपास आणि भ्रष्टाचारविरोधी कारवाई, खाजगी शाळांमध्ये जागा विक्रीवर बंदी घालून राइट टू एज्युकेशन (आरटीई) कायद्याची अंमलबजावणी, तसेच उल्हासनगरमधील रिक्त शिक्षण अधिकाऱ्याच्या पदावर लगेच नियुक्ती करणे यांचा समावेश आहे.  
या संदर्भात राज प्रकाश महाडिक यांनी म्हटले आहे, "शिक्षण हा मूलभूत हक्क आहे. मागील पाच वर्षांत उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या २००० वरून फक्त १७५ वर आली आहे. सेवा सदन ट्रस्टच्या या कृतीमुळे विद्यार्थ्यांचे भविष्य आणि शिक्षकांच्या नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. शासनाने या प्रकरणाची त्वरित चौकशी करून दोषी आढळल्यास कठोर कायदेशीर कारवाई करावी."  
या भेटीमध्ये युवा सेनेचे उपस्थित पदाधिकारी:  
- राज प्रकाश महाडिक ( अंबरनाथ विधानसभा युवा सेना अधिकारी)  
- अजय घोडके (उप शहर अधिकारी व अकोला जिल्हा विस्तारक)  
- दाहीर रामटेके (शहर समन्वयक)  
- सुरज शाहू (विभाग अधिकारी)  
- अक्षय ताजनपुरे (शाखा अधिकारी)  
- वेंकेश गुरव (कॉलेज कक्ष अधिकारी)  
- मनीष पाटील (सोशल मीडिया अधिकारी)
0 Response to "उल्हासनगर- ३ येथील न्यू एरा प्राथमिक शाळेतील शिक्षकांच्या आंदोलनाला युवासेना उ.बा.ठा गटाचा पूर्ण पाठिंबा. आंदोलनात सहभागी. "
एक टिप्पणी भेजें