-->
भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे क्रांती दिवस साजरा.

भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे क्रांती दिवस साजरा.

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

  भंडारा :- दि. ९ ऑगस्ट २०२5 भारताच्या स्वातंत्र्य संग्रामात ठसा उमटवणाऱ्या ‘९ ऑगस्ट क्रांती दिना’चे औचित्य साधून आज भंडारा शहरातील हुतात्मा स्मारक शास्त्री चौक येथे माल्यार्पण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रसेवेचे महान कार्य करणाऱ्या हुतात्म्यांना व क्रांतीकारकांना अभिवादन करण्यात आले. १९४२ च्या ‘भारत छोडो’ आंदोलनात देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या वीरांना स्मरण करून उपस्थितांनी त्यांचे कार्य व त्याग यांचा गौरव केला.
     या प्रसंगी स्वातंत्र्य चळवळीतील क्रांतीकारकांचे योगदान, त्यांचे देशभक्तीपर विचार व आजच्या पिढीने त्यातून घ्यावयाचा प्रेरणादायी संदेश यावरही भाष्य करण्यात आले.
  याप्रसंगी प्रामुख्याने उपस्थित डॉ प्रशांतजी पडोळे
 खासदार भंडारा गोंदिया लोकसभा, भंडारा शहर काँग्रेस कमिटी शहर अध्यक्ष धनराजजी साठवणे, मनोजजी बागडे, पृथ्वीराज तांडेकर, गजानन बादशहा, किशोर राऊत ,टेकचंद मारबते ,एच एल लांजेवार, नरेंद्र मानापुरे, इम्रान पटेल, प्रमोद मानापुरे ,सुरेश काटेखाये ,नवाबभाई शेख , विनीत देशपांडे ,दीपक पाटील, जीवन कावळे ,प्रेमलाल टेंभुर्कर प्रदीपजी गायधने ,आशिष लांडगे उपस्थित होते

0 Response to "भंडारा शहर काँग्रेस कमिटीतर्फे क्रांती दिवस साजरा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article