संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराची सभा संपन्न.
बुधवार, 24 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा : - दिनांक 23 सप्टेंबर 2025 रोजी संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडारा ची बैठक समितीचे मुख्य संयोजक सदानंद इलमे यांचे अध्यक्षतेखाली एस डी प्रशासकीय महाविद्यालय भंडारा येथे पार पडली.
मागील वर्षभरापासून समिती विरोधी कार्य केल्याने अचल मेश्राम व शशिकांत भोयर यांना समिती मधून निष्कासित करण्याचा एकमताने ठराव पारित करण्यात आले. तसेच एकीकृत रिपब्लिकन समिती भंडारा ह्या समितीचे संविधान बचाव संघर्ष समितीमध्ये विलीनीकरण करण्यात आले.
संविधान बचाव संघर्ष समिती मध्ये रिक्त असलेल्या जागेवर नवीन नियुक्ती करण्यात आली ती खालील प्रमाणे.
महासचिव=गोपालजी सेलोकर
सचिव=असित बागडे
कोषाध्यक्ष=इंजि. रूपचंदजी रामटेके
सहसचिव=विजय भोवते (साकोली तालुका)
सहसचिव=बंडू फुलझेले (लाखांदूर तालुका)
सहसचिव=प्रा. डॉ. सुरेश खोब्रागडे (लाखनी तालुका)
सहसचिव=राजेश मळामे (भंडारा तालुका)
सहसचिव=अशोक उईके (तुमसर तालुका)
सहसचिव=मनोहर मेश्राम (पवनी तालुका)
कोर कमिटी सदस्य=
१) अमृतजी बनसोड
२) श्रीराम बोरकर
३) हंसराज वैद्य
४) प्रा. पंजाबरावजी कारेमोरे
५) दिलीप वानखेडे
10 ऑक्टोंबर 2025 रोजी सकल ओबीसी महामोर्चात (नागपूर येथे) सहभागी होण्याचा निर्णय घेण्यात आला.
सभेला मुख्य संयोजक सदानंद इलेमे, जिल्हाध्यक्ष रोशन जांभुळकर, कार्याध्यक्ष चंद्रशेखर तेंभूर्णे, डॉक्टर बाळकृष्ण सार्वे, अजबराव चीचामे, गोपाल सेलोकर, अमृत बनसोड, हंसराज वैद्य, असित बागडे, दिलीप वानखेडे, इंजी. रूपचंद रामटेके, हिवराज उके, ग्यानचंद जांभुळकर, वामनराव गोंधुळे, रोशन उरकुडे, श्रीराम बोरकर, दुर्योधन अतकरी, अशोक उईके, अरुण लुटे, सदानंद रंगारी, विजय भोवते, संजीव भांबोरे, पंजाबराव कारेमोरे, राजेश मडामे, प्रा. डॉक्टर सुरेश खोबरागडे, श्रीकृष्ण पडोळे, दीपक गजभिये, बंडू फुलझेले, मोरेश्वर तिजारे, उपस्थित होते.
सभेचे प्रास्ताविक जिल्हा कार्याध्यक्ष चंद्रशेखर टेंभुर्णे तर आभार हिवराज उके यांनी मानले.
0 Response to "संविधान बचाव संघर्ष समिती जिल्हा भंडाराची सभा संपन्न."
एक टिप्पणी भेजें