हसारा येथे आरोग्य शिबीर संपन्न.
बुधवार, 24 सितंबर 2025
 Comment 
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
भंडारा :- आमदार राजूभाऊ कारेमोरे व मित्र परिवार तर्फे चालता फिरता दवाखान्या अंतर्गत आरोग्य शिबीर शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.या शिबिराला धनराजजी आगाशे,सरपंच हसारा,अविनाशजी पटले,उपसरपंच हसारा,वंदना ढबाले,प्रमिलाताई कटरे,प्रियांकाताई कटरे
नामदेवजी हटवार प्रमुक्याने उपस्तिथ होते.
                        तज्ज्ञ डॉक्टरांच्या पथकाने येऊन सर्व रुग्णांची तपासनी केली.शिबिरामध्ये नेत्ररोग,मेडिसिन, सर्जरी, स्त्रीरोग, बालरोग, कांना- नाक-घसा,अस्थिरोग त्वचारोग, श्वसनरोग संबधित आजारांवर तपासन्या करण्यात आले व डॉक्टरांच्या सल्ल्याने, जवळचे चष्मे, औषधी,आयड्रॉप निशुल्क वाटप करण्यात आले.ग्रामपंचायत कार्यालय हसारा येथे संपन्नया झालेल्या आरोग्य शिबिरात 320 हून अधिक लोकांनी उपचार केले असून 98 चस्मे वाटप करन्यात आले,45 रुग्णांना ऑपरेशनसाठी नागपूरच्या रुग्णालयात पाठविण्यात येणार असून संपूर्ण उपचार मोफत केले जाणार आहे.हे शिबीर प्रत्येक.शिबिराला यशस्वी करन्यासाठी,अजय बडवाईक,सोमेश्वर लांजेवार,संदीप चौधरी,बालेश्वर लांजेवार,आयुष बडवाईक,कश्यप पाटील,हर्षल चौधरी,नेहाल लाटकर,नितेश बड़वाईक,सोहम मडावी व कार्यकर्ता ने परिश्रम घेटला.
0 Response to "हसारा येथे आरोग्य शिबीर संपन्न."
एक टिप्पणी भेजें