कारधा येथे भंडारा तहसीलदार कार्यालयाकडून डि.बी.टी. पोर्टल नोंदणी शिबीराला उत्कृष्ट प्रतिसाद.
गुरुवार, 4 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- भंडारा तहसिलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी कार्यालयाच्या वतीने DBT पोर्टल नोंदणी संबंधाने ग्रामीण भागातील लाभार्थ्यांसाठी संजय गांधी निराधार व श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन योजनेतील लाभार्थ्यांचे आधारकार्ड व्हेरीफाय करण्यासाठी कारधा तलाठी कार्यालयाजवळ च्या ग्रामपंचायत परिसरात आयोजित करण्यात आले होते या शिबिरात लाभार्थी नागरिकांची गर्दी जमली असल्याने उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला आहे.
या शिबिरात भंडारा तालुक्यातील संजय गांधी योजना आणि श्रावणबाळ योजना तसेच राज्य सेवा योजने अंतर्गत लाभार्थ्यांना अर्थसहाय्याचे वितरण डी.बी.टी. व्दारे करण्यात येत असल्याचे शासन स्तरावरून प्रक्रीया सुरु सल्याचे तलाठी कार्यालयाकडून सांगण्यात आले . लाभार्थ्यांचे डेटा 100% अद्यावत करावयाचे असल्यामुळे ग्रामपंचायत कार्यालय कारधा येथे दिनांक 3सप्टेंबर 2025 ते 4सप्टेंबर 2025 रोजी सकाळी 10.00 वाजेपासून शिबिराचे आयोजन करण्यात आले होते
त्याकरिता ग्रामपंचायत कार्यालय कारधा येथे लाभार्थ्यांना आपले बैंक खाते पुस्तक (KYC असलेले), मुळ आधार कार्ड (मोबाईल क्रमांक लिंक असलेले) व OTP करीता आधार लिंक असलेले मोबाईलसह हजर रहाण्याच्या सूचना देण्यात आल्या होत्या. सूचना देऊनही लभार्थी उपस्थित न झाल्यास संजय गांधी योजना आणि श्रावण बाळ योजनेच्या लाभापासून वंचीत राहिल्यास लाभार्थीच जबाबदार राहतील असेही कळविण्यात आले होते. या शिबिराचे आयोजन भंडारा चे तहसीलदार संदीप माकोडे, नायब तहसीलदार आनंद हट्टेवार, यांच्या मार्गदर्शनात महसूल सहाय्य्क अनिल मेश्राम भंडारा तलाठी कार्यालयाचे प्रशीक वामन मोटघरे, कारधा तलाठी विठ्ठल मुंढे , पंकज रामटेके, प्रमोद रामटेके आदी यंत्रणेने योग्य सहकार्य केले.
0 Response to "कारधा येथे भंडारा तहसीलदार कार्यालयाकडून डि.बी.टी. पोर्टल नोंदणी शिबीराला उत्कृष्ट प्रतिसाद."
एक टिप्पणी भेजें