उल्हासनगर ०४ येथील प्ले स्कूल मध्ये लहान मुलाला शिल्लक कारणावरून शिक्षिके कडून मारहाण..
बुधवार, 24 सितंबर 2025
Comment
• उल्हासनगर शहरातील सर्व अनधिकृत सुरू असलेल्या प्ले स्कूलवर कार्यवाही करा -ॲड प्रशांत चंदनशिव
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर: - कॅम्प ४ येथील गुरुनानक शाळे जवळील एक्सलेंट प्ले स्कूल मधील एका लहान मुलाला शिल्लक कारणावरून झालेल्या मारहाणीचा व्हिडिओ समोर आल्याने शहरात खळबळ उडाली आहे.
सदर प्रकरणात दिसून येते की कश्या प्रकारे त्या लहान मुलाला मारत आहे आणि त्या प्ले स्कूल मधील शिक्षकेला कुठलाही शिक्षण नाही तसेच लहान मुलांसोबत कसे वागायचे याचे कुठली ही प्रशिक्षण नाही तरी त्यांना प्ले स्कूल मध्ये कामावर ठेवला आहे.अश्या प्ले स्कूल वर कठोर कायदेशीर कारवाई झालीच पाहिजे. कसं त्या लहान मुलावर ती शिक्षिका हाथ उचलते नेमका शिक्षक आहत की भक्षक तुम्ही ईतर मुलावर सुध्दा अश्याच प्रकारची वागणुक देतात का ? सदर व्हिडिओ मधील दुसऱ्या महिलेने सुद्धा त्या शिक्षिकेला अडवले असता. तरी पण त्या शिक्षिकेला समजत नव्हता पालकांनी मुलांची लाख-लाख रुपये फी काय यासाठी दिली आहे का ? शिक्षिकेचा काम काय आहे की मुलाला एक वेळा नाही समजला तर हजार वेळा समजावून सांगणे नाकी त्यांना अश्या प्रकारची मारहाण करणे.
पालकांनी आपल्या मुलांना प्ले स्कूलला पाठवण्यापेक्षा अंगणवाडीत पाठवावे जेणे करून त्यांना पोषक आहार आणि योग्य शिक्षण दिले जाईल असे आवाहन ॲड प्रशांत चंदनशिव यांनी केले आहे. तसेच त्यांनी पुढील मागणी उल्हासनगर शिक्षण अधिकारी यांच्या कडे केली आहे.
१ - शहरातील सर्व प्ले स्कूल मधील शिकवणाऱ्या शिक्षकाच्या शिक्षणाची (pre school training certificate)पात्रता तपासावी.
२- शहरातील सर्व प्ले स्कूल च्या शिक्षक तसेच कर्मचारी यांची पोलिस तपासणी (police verification) करण्यात यावे.
३- शहरातील सर्व प्ले स्कूल यांना शिक्षण मंडळ (उल्हासनगर महानगर पालिका)द्वारा मान्यता देण्यात आली की महिन्याची चौकशी करावी.
४- सर्व प्ले स्कूल मधील सीसीटीव्ही याचे लाईव्ह फुटेज सर्व पालकांच्या मोबाईल मध्ये पाहता यावी याची सक्ती करावी.
५- सर्व प्ले स्कूल ची तपासणी करावी तसेच त्यांना आपल्या द्वारा जर परवानगी देण्यात आली की नाही याची माहिती आम्हाला द्यावी.
६- तसेच सर्व प्ले स्कूल मध्ये मुलांना मारहाण होणार नाही याची सर्व प्ले स्कूल चालवणाऱ्या कडून लेखी लिहून घ्यावी.
उल्हासनगर शिक्षणअधिकारी यांच्या कडे सदर मागणी कडे जातीने लक्ष द्यावे तसेच त्याचा अहवाल आम्हाला 15 दिवसाच्या द्यावे अशी मागणी ॲड प्रशांत चंदनशिव ॲड प्रवीण करीरा व युथ फाउंडेशन च्या सचिव नानिक वाधवा यांनी केली आहे.
0 Response to "उल्हासनगर ०४ येथील प्ले स्कूल मध्ये लहान मुलाला शिल्लक कारणावरून शिक्षिके कडून मारहाण.. "
एक टिप्पणी भेजें