राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत कु. प्राची साखरे हिचे सुयश.
बुधवार, 8 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर (चौ) :- स्थानिक श्री संताजी कला व विज्ञान महाविद्यालय पालांदूर (चौ) येथील कु. प्राची साखरे बी.ए. सेम पाचवा या विद्यार्थिनीने शिवरामजी मोघे कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय केळापूर ( पांढरकवडा ) जि.यवतमाळ येथील इतिहास विभागातर्फे आयोजित “ आंतर महाविद्यालयीन राज्यस्तरीय निबंध स्पर्धा” यात सहभाग घेऊन महात्मा ज्योतिबा फुले यांचे जीवन व कार्य या विषयावर निबंध सादर केला. त्या निबंधाला द्वितीय क्रमांक प्राप्त केल्याने मा. डॉ. सोमदत्त करंजेकर अध्यक्ष बहुउद्देशीय विकास संस्था नागपूर, डॉ. गिरीश लांजेवार प्रभारी प्राचार्य, डॉ. राजेंद्र खंडाईत इतिहास विभाग प्रमुख यांनी तिचे अभिनंदन केले. तर स्पर्धेच्या माध्यमातून महाविद्यालयाला प्राप्त झालेले प्रमाणपत्र व निबंध स्पर्धेची बक्षीस पात्र रोख रक्कम व पुष्पगुच्छ प्राचार्याच्या हस्ते देऊन सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रम प्रसंगी डॉ. राजेंद्र खंडाईत, डॉ. संजय कुमार निंबेकर डॉ. रमेश बागडे, डॉ. रवी पाठेकर, डॉ. दीपक अंभोरे, डॉ. नितीन थूल, प्रा. प्रमोद शेंडे प्रा. मनोज मोहतुरे उपस्थित होते.महाविद्यालयातील सर्व प्राध्यापक व कर्मचारी वृंदांकडून तिचे कौतुक करण्यात आले.पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देऊन तिचा गौरव करण्यात आला.
0 Response to "राज्यस्तरीय आंतर महाविद्यालयीन निबंध स्पर्धेत कु. प्राची साखरे हिचे सुयश."
एक टिप्पणी भेजें