भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोसे बाधितांचे आरपार कायम निवासी आंदोलन सुरू.
मंगलवार, 7 अक्टूबर 2025
Comment
• गोसेचा नेपाळ होणार नाही , शासनाने तात्काळ दाखल घेण्याची गरज
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- गोसीखुर्द संघर्ष समितीच्या वतीने गोसेखुर्द बाधितांच्या मागण्यांकरिता जिल्हाधिकारी कार्यालय भंडारा येथे दिनांक 6 ऑक्टोबर 2025 पासून गोसेखुर्द प्रकल्पग्रस्त संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे यांच्या नेतृत्वात गोसे बाधितांचे आरपार कायम निवासी आंदोलन सुरू करण्यात आलेले आहे. जोपर्यंत शासन दखल घेणार नाही तोपर्यंत निवासी आंदोलन सुरू राहणार असल्याचे गोसेखुर्द संघर्ष समितीचे अध्यक्ष भाऊ कातोरे यांनी पत्रकार संजीव भांबोरे यांच्याशी बोलताना सांगितले. गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांच्या प्रमुख मागण्यांमध्ये पूर्णसंचय जलसाठा 245. 500 मीटरने बाधित होणाऱ्या भंडारा नागपूर जिल्ह्यातील 43 गावांचे पुनर्वसन आणि बाधित होणाऱ्या 2088 हेक्टर शेती संपादित करून नवीन भूसंपादन कायदा नुसार आर्थिक मोबदला देण्यात यावा, यात भंडारा जिल्ह्यातील खमारी,खापा ,अजीमाबाद, मुजबी ,दवडीपार, दाभा, गणेशपुर, भोजापूर ,सालेबर्डी, कारधा, तिडी, कोरंभी देवी, बेला, कोतुर्णा, खैरी ,बेटाळा , कवडसी, बेरोडी टोला, करजखेडा नवीन, जमनी , लोहारा ,भंडारा खास, पावणगाव खमाटा बेताळा, सुरबोडी, पेवठा ,बोरगाव बुद्रुक स टोली ,साहुली ,इत्यादी गावाचा समावेश आहे. नागपूर जिल्ह्यातील आवरमारा , राजोला, खुरसापार, बदनापूर, कोटगाव ,टाकळी ,आमटी, चाफेगडी, चीजघाट, 58, कुजबा जांभुर्डा पोहरा, शिवनी, चिचाळ ,केसरी ,इत्यादी गावांच्या समावेश आहे. त्याचप्रमाणे मासेमार बांधवांना मासेमारीचे स्वतंत्र पूर्वीसारखे अधिकार देण्यात यावे ,प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र नव्याने देण्यासाठी आणि नामांतर करण्यासाठी संबंधित गावात शिबिर आयोजित करून प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र देण्यात यावे. वरील मागण्या ह्या राष्ट्र असून पूर्ण करणे गरजेचे आहे .तेव्हा गोसीखुर्द प्रकल्प महत्वकांक्षी प्रकल्प होईल. या मागण्यासाठी 10 हजार कोटी रुपयांचे आर्थिक तरतूद करावीच लागते. अन्यथा प्रकल्प रद्द करून प्रकल्पग्रस्तांच्या जमिनी परत कराव्या लागतात. याची मायबाप सरकारने दखल घ्यावी. कारण नागपूर शहर सजविण्यात लाखो कोटी रुपयांची उधळण होत आहे हे वास्तव्य आम्ही गोसेखुर्द प्रकल्पग्रस्तांना स्पष्ट दिसत आहे .नको ते होण्याची वाट पाहण्यापेक्षा योग्य तोंडगा काढावा अन्यथा गोसेचा नेपाळ होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी. आंदोलन यशस्वी करण्याकरता भाऊ कातोरे, अतुल राघोरते, यशवंत टिचकुले ,अजय इंदुरकर ,सोमा क्षीरसागर ,रामोजी राघोरते, प्रदीप निंबार्ते, आरजू मेश्राम ,कृष्णा केवट, प्रमिला सहारे ,मनीषा भांडारकर, नदुबाई काळे ,चेतन राघोरते ,विनोद वंजारी ,संदीप राखुडे ,सुभाष उके ,दीपक पाल, शिवशंकर माटे ,जितेंद्र गजभिये, नाशिक चवरे ,शेषराज रामटेके , नलू काळे,आशिष कांबळे ,मंजुषा देवगडे ,समीर देवगडे ,दिलीप मडामे ,गणेश मलेवार ,नरेंद्र पवनकर ,विजय हटवार, देवलाल वावरे, योगेश मनगटे ,सुनील शेंडे ,रतन मनगटे ,विलास भोयर ,अशोक बावणे ,भाऊराव नेरकर ,अभिमान सोनवणे ,अजय रेहपाडे,मंजुषा आंबेडारे, राधाबाई भुरे, एजाज अली सय्यद , प्रवीण तिजारे, अवी सुमकिनवार,सहकार्य करीत आहेत.
0 Response to "भंडारा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर गोसे बाधितांचे आरपार कायम निवासी आंदोलन सुरू."
एक टिप्पणी भेजें