मातंगानो आपला झेंडा निळा,आपला आदर्श बाबासाहेब --प्रशांत रणदिवे (soas लडंन विघापीठ)
बुधवार, 1 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
काही आंबेडकरी समाजातील हिंदू मानसिकता असलेले, स्वतःला दलित म्हणून घेणारे हिंदू महार तुमचा तिरस्कार करत ही असतील पण जास्तीत जास्त आंबेडकरी समाज मातंग बांधवांना चांभार ढोर व इत्यादी अनुसूचित जाती जमातीतील लोकांना एवढा जवळ करत नाही पण मातंगांना जवळ करतो कारण मातंग समाज जरी दारिद्र्य रेषेखाली असला तरी बाबासाहेबांना आपला नेता समजतो मानतो कारण हा समाज प्रामाणिक आहे, त्याला जान आहे की बाबासाहेबांचे उपकार आपल्यावर आहेत इतर एस सी, एस टी सारखा कृतघ्न नाही, हे आमच्या सारख्या बौद्धांना चांगलेच माहीत आहे.
आज काही प्रमाणात आंबेडकरी समाज जागृत असल्याने जातीयवाद्या विरोधात लगेच आक्रमक होतो, तो आर्थिक व सामाजिक स्तरावर सुधारलेल्या अवस्थेत आहे पण मातंग समाज अंधश्रद्धेतून आजही बाहेर पडत नाही, शैक्षणिक धोरणात आजही त्याचा सपशेल पराभव झालेला आहे, त्याचे आत्मचिंतन मातंग समाजानेच करावे. आज आपण पहातो, इतर एस सी वाले आरक्षण घेऊन ही कधीच बाबासाहेबांचे उपकार मानत नाहीत, हे चांगलेच निदर्शनास आले आहे, ते स्वतःला कट्टर हिंदू समजतात, आर्थिक बाजूने थोडेबहुत सुधारले पण त्यांच्या हिंदू धर्मात ते आजही दलित, खालचे, प्रतिष्ठा नसलेले मागासलेले आरक्षण घेऊन पुढे गेलेले समजतात त्यांना हिंदू उच्च वर्णीय लोक., म्हणून ते सतत हिंदू उच्च वर्णीय लोकांच्या पुढे पुढे करतात.
आज आंबेडकरी समाजानंतर मातंग समाजावर ग्रामीण भागात भयंकर अत्याचार करण्यात येत आहे, हे आपण रोजच वर्तमान पत्र किंवा समाज माध्यमांवर पहात आहोत ऐकत आहोत., अन्याय अत्याचाराकडे दुर्लक्ष करत आहेत हिंदू कट्टर मातंग आणि आंबेडकरी समाजाला लक्ष्य करत आहेत, आमचे काहीच वाकडं होणार नाही उलट तुमचा वापर करून तुम्हाला फेकून देतील जसं इतके दिवस मराठा समाजाला केले तशी तुमचही अवस्था पुढे भविष्यात होणार आहे. मराठा समाज शेती जमीन, गावगुंड, राजकीय क्षेत्रात जरब असल्याने तो सावरला पण तुमचं पुढे बघा, अतोनात सत्यानाश होईल, वेळीच सावध व्हा नाहीतर पुढे आम्हाला पहायला मिळेलच "तमाशा"!..
0 Response to "मातंगानो आपला झेंडा निळा,आपला आदर्श बाबासाहेब --प्रशांत रणदिवे (soas लडंन विघापीठ)"
एक टिप्पणी भेजें