-->
अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी ४ आरोपी विरुद्ध गुन्हा.

अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी ४ आरोपी विरुद्ध गुन्हा.

• पालांदूर पोलिसांची कार्यवाही,पाचगाव टोली येथील घटना. 

नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

पालांदूर :- पोलीस स्टेशन अंतर्गत पाचगाव/ टोली तालुका लाखांदूर येथे बिना परवाना जेसीबी व टिप्परच्या आधाराने अवैध उत्खनन व वहन करताना सापडले. यात चार आरोपी विरोधात गुन्ह्याची नोंद पालांदूर येथे करण्यात आली. वामन नत्थूजी धारणे (२८), राहणार वडेगाव तालुका पवनी, अजय प्रकाश मेश्राम (२४) राहणार बामणी तालुका पवनी, सुरज हिरालाल लांजेवार (२५) राहणार मासळ तालुका लाखांदूर, आदित्य मोहनलाल नखाते (२९) राहणार मासळ तालुका लाखांदूर असे आरोपींचे नाव आहे. ही घटना शनिवारला (२२ नोव्हेंबर) १:३० ते २:४५ वाजे घडले. पोलीस शिपाई पुंडलिक सिंगनजुडे यांच्या तक्रारीवरून गुन्ह्याची नोंद घेण्यात आली. 

जेसीबी मशीन ने अवैध मुरूम उत्खनन करून ताब्यातील दोन टिप्पर मध्ये भरून अवैध बिना पास परवाना मुरूम चोरी करून वाहतूक करताना मिळून आल्याने ताब्यात घेण्यात आले. महसूल अधिकारी तहसील कार्यालय लाखांदूर यांना माहिती देऊन पंचनामा करून पालांदूर पोलीस स्टेशनला मुद्दमाल जप्त करण्यात आले आहे. ५७,५०,००० लाख रुपयाचा मुद्देमाल ताब्यात घेण्यात आला. तपास पो. उपनि पेदोर करीत आहेत. 


0 Response to "अवैध मुरूम उत्खनन प्रकरणी ४ आरोपी विरुद्ध गुन्हा. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article