-->
जगातील सर्वश्रेष्ठ घटना म्हणे भारतीय संविधान !..

जगातील सर्वश्रेष्ठ घटना म्हणे भारतीय संविधान !..

                      प्रभाकर सोमकुवर
                             नागपूर
                   मो. क्र. 9595255952


 आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही घडविण्याच्या व त्याचा सर्व नागरिकांस, सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार अभिव्यक्ती, विश्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता, निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्यामध्ये व्यक्तिची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन आमच्या संविधान सभेत आज दि. 26 नोव्हेंबर 1949 रोजी या द्वारे हे संविधान अधिकृत आणि अधिनियमित करुन स्वत: प्रत अर्पण करीत आहोत.
 ही भारतीय संविधानाची उद्दे‍शिका आहे, संविधानाची उद्दे‍शिका हाच संविधानाचा आत्मा आहे. संपूर्ण संविधान याच उद्दे‍शिकेवर आधारित आहे. भारतीय संविधानात नागरिकांचे मुलभूत अधिकार आणि कर्तव्य यांना फार महत्व देण्यात आले आहे. स्वातंत्र्याचा हक्क समतेचा हक्क, शैक्षणिक हक्क, सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क, शोषणाविरुध्दचा हक्क हे मुलभूत हक्क घटनेने नागरिकांना बहाल केले आहेत. त्याच बरोबर प्रत्‍येक नागरिकांनी राष्ट्रीय प्रतिकांचा मान राखणे, संविधानाने घालून दिलेल्या नियमांचे पालन करने, देशाची अखंडता कायम राखणे, सार्वजनिक मालमत्तेची काळजी घेणे, देशासाठी नेहमी तत्पर राहणे ही मुलभूत कर्तव्यही संविधानात दिली आहेत. आपल्या हक्का सोबत आपल्या कर्तव्याचीही जाणीव करुन देणारे व जगातील सर्वात मोठे असणाऱ्या भारतीय संविधानाच्या निर्मितीचा इतिहास जाणून घ्यायला हवा.
 आज दि. 26 नोव्हेंबर, आजचा दिवस संपूर्ण देशात संविधान दिन म्हणुन साजरा करण्यात येतो. आजच्या दिवशी म्हणज 26 नोव्हेंबर 1949 रोजी भारताचे संविधान स्वीकारण्यात आले. भारतीय संविधानाला आज 26 नोव्हेंबर 2024 रोजी 75 वर्षे पूर्ण होत आहेत. गेली 75वर्षे संविधानाने देशाला एकसंघ ठेवण्याचे काम केले आहे. जगातील सर्वात मोठी लोकशाही संविधानामुळेच जिवंत आहे. संविधान हा देशाचा राष्ट्रीय ग्रंथ आहे. देशाचे अखंडत्व संविधानामुळेच टिकून आहे. भारतातील विविधता, अनेक भाषा, संस्कृती, धर्म, जात, पंथ, वंश वेगवेगळया चालीरिती, रुढी पंरपरा या सर्वांना एक सुजान बांधणार गुरुमंत्र म्हणजे संविधान.
  26 नोव्हेंबर हा दिवस संविधान अंमलबजावणी करण्यासाठी निवडण्यात आला. 9 डिसेंबर 1946 ला घटना समितीचे कामकाज सुरु झाले. 11 डिसेंबर 1946 रोजी डॉ. राजेंन्द्रप्रसाद यांची घटना समितीचे अध्यक्ष म्हणुन निवड करण्यात आली. यात 9 मान्यवरांचा सदस्य म्हणुन समावेश करण्यात आले 29 ऑगस्ट 1947 रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या नेतृत्वाखाली मसुदा समितीची स्थापना करयात आली. डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी 2 वर्ष 11 महिने 18 दिवसात एकटयाने अत्यंत निष्ठेने आणि तन्मयतेने पार पाडली आणि संपूर्ण संविधानाचा मसुदा तयार करुन घटना समितिचे अध्यक्ष डॉ. राजेंन्द्रप्रसाद यांच्याकडे 26 जानेवारी 1949 रोजी सुपूर्द केली आणि 26 जानेवारी 1950 पासुन त्याची अंमलबजावणी सुरु झाली. भारत एक सार्वभौम प्रजासत्ताक राज्य बनले. त्यामुळेच 26 जानेवारी हा दिवस मोठया उत्साहात प्रजासत्ताक दिन म्हणुन साजरा करतो. संविधान निर्मीतीत डॉ. बाबासाहेबांचे योगदान अनन्य साधारण आहे, म्हणुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना घटनेचे शिल्पकार संबोधण्यात येते.



0 Response to "जगातील सर्वश्रेष्ठ घटना म्हणे भारतीय संविधान !.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article