-->
साकोलीत कॉग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांचे 'राजीनामे.'

साकोलीत कॉग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांचे 'राजीनामे.'

"साप्ताहिक जनता की आवाज"
 वुत्तपत्र प्रतिनिधी 

 साकोली :- साकोली नगरपरिषदेत ठेकेदारी कमिनशखोरी कायमची बंद होऊन एक पारदर्शक भ्रष्टाचार मुक्त विकास व्हावा यासाठी साकोली सोशल मिडीयातून जनतेची स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करा-रनामा सत्र मोहिम जोरात सुरू आहे. तर ठेकेदारांनाच उमेदवारी का दिली.? म्हणून कॉग्रेसच्या १३ नाराज पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचा राजीनाम्याचे पत्र (शुक्र. २१ नोव्हें.) ला शहराध्यक्ष दिलीप मासुरकर यांच्याकडे सोपविले. या प्रकाराने साकोली शहर काँग्रेस पक्षात ठेकेदारी वरून चांगलेच रणकंदन माजले आहे. साकोली सेंदूरवाफा

नगरपरिषद निवडणूकीत मागच्या सार खी ठेकेदारी कमिनशखोरी होऊ नये, पुन्हा शहराचा बोगस ठेकेदारीत सत्यानाश होऊ नये, यासाठी येथील जागृत जनतेने "मी नगरसेवक झाल्यास

कोणतीही ठेकेदारी कमिनशखोरी करणार नाही, आढळल्यास माज्या पदाचा राजीनामा देत गुन्हा दाखल करण्यात यावा" असा स्टॅम्प पेपरवर शपथपत्र करारनामाची मोहीम जोरात

सुरू आहे. याच विषयावरून साकोली शहरातील कॉंग्रेस पक्षातील विविध पदांवर कार्यरत निष्ठावंत पदाधिकारी व कार्यकत्यांना डावलून ठेकेदारांनाच उमेदवारी दिल्याबद्दल आम्ही सर्व एक मिळून एकमताने राजीनामा देत आहोत. असे पत्र शहर अध्यक्ष दिलीप मासुरकर यांना शुक्रवारी देण्यात आले. राजीनामा देणा-यांमध्ये भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे शहर महासचिव अमोल टेंभूर्णे, कार्यालय महासचिव विजय साखरे, शहर उपाध्यक्ष दिलीप निनावे, शहर उपाध्यक्ष कृष्णा हुकरे, संघटक सचिव विशाल गजभिये, इंटक शहराध्यक्ष सचिन राऊत, शहर उपाध्यक्ष सतीश रंगारी, सेवादल अध्यक्ष मनोहर

भिवगडे, अनु. जाती. शहरचे पराग कोटांगले, बुथ कमेटी क्र. ५ अध्यक्ष दिनेश राऊत, शहर उपाध्यक्ष प्रकाश रोकडे, शहर काँग्रेसचे राजू जुगनाके, कांग्रेस संघटीका प्रभाग क्र. ७ चे वैशाली गजभिये या १३ जणांचा समावेश आहे.

सध्या साकोली सेंदूरवाफा शहरात जागृत जनतेचा "ठेकेदारी कमिनशखोरी मुक्त नगरपरिषद" वर स्टँम्प पेपरवर शपथपत्र करारनामा मोहिम जोरात सुरू असतांनाच ठेकेदा-रांनाच उमेदवारी का दिली.? यावरून तब्बल १३ कॉंग्रेसच्या पदाधिकाऱ्यांचा तडकाफडकी राजीनाम्याने काँग्रेस पक्षात चांगलीच खळबळ उडाली आहे.

0 Response to "साकोलीत कॉग्रेसच्या १३ पदाधिकाऱ्यांचे 'राजीनामे.'"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article