-->
पवनी न्यायालयाचा निर्णय धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.

पवनी न्यायालयाचा निर्णय धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"

भंडारा - आपल्याला सोलर कृषी पंपाचे कंत्राट मिळणार आहे आणि त्यासाठी पैशाची गरज आहे,असे कारण सांगून आरोपीने फिर्यादी कडून उधार रक्कम घेतली; परंतू ही उधार घेतलेली रक्कम परतफेडीसाठी दिलेला धनादेश अनादरित झाला.त्यामुळे पवनी न्यायालयाने आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.

भंडारा तालुक्यातील मौजा गोलेवाडी येथील आरोपी नामे घनश्याम दिगांबर मडावी यांचे मैत्री संबंध पवनी तालुक्यातील मौजा कोरंभी येथील फिर्यादी नामे राजेश हरीभाऊ येवले यांच्या सोबत होते.त्यातून आरोपीने फिर्यादी कडून त्याला सोलर कृषी पंपाचे कंत्राट मिळणार आहे व त्यासाठी पैशाची गरज आहे असे कारण सांगून फिर्यादी कडून दोन लाख पंच्याहत्तर हजार रुपये उधार मागीतले होते. या रकमेच्या परतफेडीसाठी आरोपीने फिर्यादीला एक लाख पंचवीस हजार रुपयाचा धनादेश दिला होता; परंतू सदरचा धनादेश अनादरित झाला.

त्यामुळे फिर्यादी पक्षाने पवनी येथील प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात आरोपीला शिक्षा मिळावी व दंड व्हावा यासाठी परक्राम्य लेख कायद्याच्या कलम १३८ अन्वये फौजदारी प्रकरण दाखल केले होते. या प्रकरणी न्यायालयाने फिर्यादी पक्षांकडून सादर केलेला कागदोपत्री पुरावा व फिर्यादी पक्षाने सादर केलेल्या साक्षीदारांच्या बयानांच्या आधारावर आरोपी नामे घनश्याम दिगांबर मडावी याला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली.तसेच धनादेशाची रकम रुपये एक लाख पंचवीस हजार प्रकरण दाखल झाल्याच्या तिथी पासून सहा टक्के व्याज दराने परत द्यावेत, अशी द्रव्य दंडाची शिक्षा सुनावली.परंतू जर दंडाची रक्कम न भरल्यास तीन महिने साध्या कारावासाची शिक्षा पवनीचे न्यायाधीश श्री.अ.वि.पंडित यांनी ठोठावली.

या प्रकरणी फिर्यादी पक्षांकडून जेष्ठ विधीज्ञ ॲड. महेंद्र गोस्वामी यांनी युक्तिवाद करून सक्षमपणे फिर्यादीची बाजू न्यायालयात मांडली.

0 Response to "पवनी न्यायालयाचा निर्णय धनादेश अनादर प्रकरणी आरोपीला एक वर्ष सक्तमजुरीची शिक्षा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article