-->
११ नोव्हेंबर रोजी भटके विमुक्त सामाजिक संस्था, अंबरनाथ तर्फे बेघर, गरजू नागरीकांना मदतीचा हात

११ नोव्हेंबर रोजी भटके विमुक्त सामाजिक संस्था, अंबरनाथ तर्फे बेघर, गरजू नागरीकांना मदतीचा हात

सोनू संजीव क्षेत्रे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

 अंबरनाथ :- या कार्यक्रमाचे आयोजन भटके विमुक्त सामाजिक संस्था यांनी बेघर निवारा केंद्र, अंबरनाथ येथे आयोजित केले होते.
कार्यक्रमाचे मुख्य आयोजक व संस्थेचे अध्यक्ष श्री. सुंदरजी डांगे आणि मनीलाल डांगे होते.

या उपक्रमाला मा. शब्बीर सय्यद साहेब (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, अंबरनाथ पोलीस ठाणे) मा. वसंत पाटील साहेब (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) आणि मा. विलास गायकवाड साहेब (सेवानिवृत्त पोलीस अधिकारी) यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

कार्यक्रमात युवा समाजसेवक आकाश दीपक मेंगजी व राकेश दामजी यांनी सहभाग घेत बेघर, गरजू आणि ज्येष्ठ नागरिकांना आवश्यक साहित्याचे वाटप केले.

विशेष म्हणजे, वृद्ध मातांसाठी आणि ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष वाटप व्यवस्था** करण्यात आली होती.

हा उपक्रम सामाजिक बांधिलकीचे उत्कृष्ट उदाहरण ठरला असून उपस्थितांनी संस्थेच्या या सामाजिक कार्याचे मनःपूर्वक कौतुक केले.

0 Response to "११ नोव्हेंबर रोजी भटके विमुक्त सामाजिक संस्था, अंबरनाथ तर्फे बेघर, गरजू नागरीकांना मदतीचा हात "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article