लोक अदालतीमध्ये महापालिकेने केला २ कोटी १७ लक्ष मालमत्ता कर वसुल.
सोमवार, 15 दिसंबर 2025
Comment
विजय चौडेकर
"साप्ताहिक जनता की आवाज"
नांदेड :- जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या संयुक्त विद्यमाने दिनांक १३.१२.२०२५ रोजी पालिकेच्या मुख्य प्रशासकीय इमारतीत राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते. लोक अदालतीच्या अनुषंगाने मालमत्ता धारकांना आपल्या मालमत्ता करा विषयी असलेल्या तक्रारीचे निवारण करुन घेण्याकरीता सुचित केले व मालमत्ता कराचा भरणा करुन महानगरपालिकेस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले.
या राष्ट्रीय लोक अदालतीसाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाकडून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या थकबाकीदार मालमत्ता धारकांना नोटीसा देण्यात आल्या होत्या. त्या अनुषंगाने दिनांक १३.१२.२०२५ रोजी सकाळी १०.३० वा. पासुन लोक अदालतीस सुरुवात करण्यात आली. राष्ट्रीय लोक अदालतीसाठी आलेल्या मालमत्ता धारकांना *मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे व न्यायाधिश ए.आर. भडके, (पॅनल प्रमुख),* यांनी कायदेविषयक बाबी समजावून सांगितल्या व मालमत्ताधारकांच्या तक्रारीचे निरसन केले. आज झालेल्या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये *एकूण ११६२ मालमत्ताधारकांनी* थकबाकीवरील शास्तीत ८०% सुट योजनेचा लाभ घेवुन एकुण तब्बल २ कोटी १७ लक्ष एवढ्या रकमेचा मालमत्ता कर भरणा केला.
या राष्ट्रीय लोक अदालती मध्ये *प्रमुख जिल्हा न्यायाधीश सुनिल जी. वेदपाठक, मनपा आयुक्त तथा प्रशासक डॉ.महेशकुमार डोईफोडे,* सचिव विधी सेवा प्राधीकरण एस.जी. देशपांडे, न्यायाधिश ए.आर.भडके, सह दिवाणी न्यायाधिशस्तर, नांदेड (पॅनल प्रमुख), एडवोकेट रंजना लांडगे, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार, उपआयुक्त स.अजितपालसिंघ संधु, सहाय्यक आयुक्त मनिषा नरसाळे, सिस्टीम मॅनेजर सदाशिव पतंगे, मनपाच्या सहा क्षेत्रिय कार्यालयाचे क्षेत्रिय अधिकारी मिर्झा फरहतुल्लाह बेग, रमेश चवरे, रावण सोनसळे, गौतम कवडे, निलावती डावरे, राजेश जाधव, न्यायालयीन कर्मचारी एम.बी. भोसीकर, डी. एस. कापसे, एल.बी. पेन्सलवार सर्व क्षेत्रिय कार्यालयाचे वसुली पर्यवेक्षक, वसुली लिपीक व त्यांचे सहाय्यक उपस्थित होते.
पालिका हद्दीतील ज्या मालमत्ताधारकांनी आपल्या मालमत्ता कराचा अद्याप भरणा केला नाही त्यांनी तात्काळ कर भरणा करावा व भविष्यात मनपाकडून होणाऱ्या जप्ती, नळबंद करणे, ड्रेनेज बंद करणे, लिलाव करणे या सारख्या अप्रिय कार्यवाह्या टाळाव्यात असे आवाहन मनपा आयुक्त डॉ.महेशकुमार डोईफोडे यांनी मालमत्ताधारकांना केले आहे.
0 Response to "लोक अदालतीमध्ये महापालिकेने केला २ कोटी १७ लक्ष मालमत्ता कर वसुल."
एक टिप्पणी भेजें