-->
बेलगाव येथे प्राची चटप चा सत्कार

बेलगाव येथे प्राची चटप चा सत्कार

 
संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- विद्यार्थ्यांनो प्रतिकूल परिस्थितीचा सामना करून शुन्यातून जग निर्माण करणाऱ्या भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार कु. प्राची चटप चा आदर्श डोळ्यासमोर ठेवणे गरजेचे आहे. असे मत मंगला बहु, शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सचिव भजनदास वाढई यांनी केले.
          ते मंगला बहुउद्देशिय शिक्षण संस्था भिलेवाडा द्वारा संचालित कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयात प्राची चटप चा सत्कार करतांना बोलत होते.
       कार्यक्रमाला नाट्य अभिनेता, साहीत्यिक प्रा. डॉ. शिलवंतकुमार मडामे, मंगला बहु, शिक्षण संस्थेचे संस्थापक तथा सचिव भजनदास वाढई, शाळा समिती सदस्य केवळराम मोटघरे, बेलगाव येथील सरपंचा सौ. रिनाताई तुमसरे, माजी पं. स. सदस्य रामकृष्ण बेदरकर, सेवानिवृत्त शिक्षक ब्रम्हा मोटघरे, सामाजिक कार्यकर्ते विलास केजरकर, पोलीस पाटील रामुजी वाट, सेवानिवृत्त मुख्याध्यापक ए. एच. मेश्राम, स्नेहा मोटघरे, अमरकंठ मारवाडे, रमेश मसराम, प्रमोद मेश्राम, सुमित आग्रे, बेलगाव येथील कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य ओंकार शेन्डे, हिमांशू मसराम, कु. आरती बोरकर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. 
       त्यावेळी मान्यवरांच्या हस्ते कस्तुरबा गांधी विद्यालय तथा कनिष्ठ महाविद्यालयाची माजी विद्यार्थिनी तथा भारतीय आट्यापाट्या संघाची कर्णधार तथा सुवर्णपदक विजेती कु. प्राची चटप हीचा शाल, स्मृतिचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.  
      प्राची चे अभिनंदन मंगला बहु. शि. संस्थेच्या सदस्या शोभाबाई सेलोकर, मांडवी उपसरपंच प्रभाकर सार्वे, बेलगाव उपसरपंच मनोज वळतकर, स्वामी विवेकानंद स्टडी सर्कल, कारधा पोलीस स्टेशनचे सहाय्यक निरिक्षक प्रशांत साखरे, शाळा समिती अध्यक्षा सौ. सुमन वाढई, माटोरा माजी सरपंच किशोर निंबार्ते, मंगला बहु. शिक्षण संस्था भिलेवाडाच्या अध्यक्षा सौ. लताताई बांते, विकास धरमशहारे, सी. टी. ठवकर, नितीन मस्के, एच.डी. संग्रामे, एस. पी. खोब्रागडे, कु. एम. एस. भोंदे, धिरज सरकार, गौरव मेश्राम, कु. प्रिती बचेरे, मंगला राघोर्ते, एस. पी. खोब्रागडे, व्ही. झेड. शेन्डे, आशिष चौधरी, रवि ठवकर, ए. आर. मस्के, आर. आर. नागपूरे, दिनेश नैताम, सुरेश कठाणे, टी. एन. बान्ते, हितेश वाढई, गोवर्धन बडोले, विद्यार्थी- विद्यार्थिनींनी शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी करून शुभेच्छा दिल्या आहेत.

0 Response to "बेलगाव येथे प्राची चटप चा सत्कार"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article