लाखनी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडून ३,३०,०००/- रु. किंमतीचे दागिने हस्तगत केले.
मंगलवार, 30 दिसंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
लाखनी :- दिनांक २४/१२/२०२५ चे दुपारी ०४:३० वा. सुमारास एक इसम सोन्याचे दागिने विक्रीकरिता ग्राहक शोधत असल्याची गोपनीय माहिती मिळाल्याने पोलीस निरीक्षक सुभाष बारसे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार अमितेश वडेटवार, वच्छला चाचेरे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सार्वे, सचिन बुधे, हिवराज गायधने, प्रशांत धकाते यांनी पंचासमक्ष त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव भिमराज नेमीचंद मेश्राम वय २८ वर्षे, रा. सेलोटी, ता. लाखनी, जि. भंडारा असे सांगितले. त्याची अंगझडती घेतली असता त्याचे ताब्यात १) एक सोन्याचे ३८ मणी असलेली एकदाणी वजन ५ ग्रॅम कि. अं. ५०,०००/- रु. २) एक सोन्याचे लहान ५३ मणी असलेली गरसोळी वजन २.५ ग्रॅम किं. अं. २५,०००/- रु., ३) एक सोन्याची नथ वजन ६.८ ग्रॅम किं. अं. ६५,०००/- रु., ४) एक सोन्याची लहान नथ वजन १.३ ग्रॅम कि. अं. १०,०००/- रु., ५) दोन सोन्याचे गोप प्रत्येकी वजन १० ग्रॅम एकूण २० ग्रॅम किं. अं. १,८०,०००/- रु. असा एकूण ३,३०,०००/- रु. चा मुद्देमाल मिळून आल्याने त्याला मिळून आलेल्या मुद्देमालाबाबत विचारपूस केली असता उडवाउडवीचे उत्तरे देऊन समाधानकारक उत्तर दिले नाही. तसेच मिळून आलेल्या मुद्देमालाचे कोणताही कागदी पुरावा किंवा बिल सादर केले नाही.
सदर इसम हा पो.स्टे. अभिलेखावरील सराईत गुन्हेगार असल्याने त्याचेकडे मिळून आलेले दागिने हे चोरीचे किंवा लबाडीने मिळविलेले असल्याची खात्री झाल्याने त्याचेवर कलम १२४ महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये कारवाई करण्यात आली. सदर इसमाला स्थानिक गुन्हे शाखा भंडारा चे ताब्यात दिले असता त्याचेकडून जिल्ह्यातील लाखांदूर, साकोली, पालांदूर येथील घरफोडी चे ०५ गुन्हे उघडकीस आणण्यात आले. सदर कार्यवाही पोलीस अधीक्षक नूरुल हसन, अपर पोलीस अधीक्षक निलेश मोरे, उपविभागीय पोलीस अधिकारी साकोली शिवम विसापूरे यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुभाष बारसे, पोलीस हवालदार अमितेश वडेटवार, वच्छला चाचेरे, पोलीस शिपाई ओमप्रकाश सार्वे, सचिन बुधे, हिवराज गायधने, प्रशांत धकाते यांनी केली आहे
0 Response to "लाखनी पोलीसांनी सराईत गुन्हेगाराकडून ३,३०,०००/- रु. किंमतीचे दागिने हस्तगत केले."
एक टिप्पणी भेजें