तुमसर नगरपरिषदेत 'घडी'चे काटे फीरले उलटे!..B
शनिवार, 3 जनवरी 2026
Comment
• 10 विरुद्ध 8 च्या संघर्षात जिल्हाधिकाऱीच ठरवणार 'निर्णायक' निकाल!.
• 'कायद्याच्या 'चौकटित,अडकले.. नगरसेवक!
• मुंबईतून' राकाचे जिल्हाधिकारी कार्यालयात 'व्हिप,
• नगरसेवकावर अपात्रतेची टांगती तलवार.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
तुमसर :- नव वर्षाच्या प्रारंभीच तुमसरच्या राजकीय क्षितिजावर मोठा भूकंप झाला असून, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उभी फूट पडल्याचे स्पष्ट झाले आहे. नगरपरिषदेत निवडून आलेल्या १० नगरसेवकांपैकी ८ जणांनी बंडाचे निशाण फडकवल्याने 'पक्ष विरुद्ध नगरसेवक' असा थेट सामना आता जिल्हाधिकाऱ्यांच्या दरबारी पोहोचला आहे. या सत्तासंघर्षात आता नेमकी बाजी कोण मारणार, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
नुकत्याच झालेल्या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गट) चिन्हावर १० नगरसेवक निवडून आले होते.
नियमानुसार या १० जणांचा एकच गट होणे अपेक्षित होते. मात्र, अंतर्गत धुसफुसीतून २९ डिसेंबर रोजी ८ नगरसेवकांनी एकत्र येत आपला स्वतंत्र गट स्थापन करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज केला. विशेष म्हणजे, पक्षातील उर्वरित २ सहकाऱ्यांना या हालचालींपासून पूर्णपणे 'अनभिज्ञ' ठेवण्यात आले, ज्यामुळे वादाची ठिणगी पडली.
एकीकडे ८ नगरसेवक आपल्या बहुमताचा दावा करत असतानाच, मुंबईतून राष्ट्रवादीचे प्रदेश सरचिटणीस आ. शिवाजीराव गर्जे यांचे अधिकृत पत्र (जावक क्र. १४०३) जिल्हाधिकारी कार्यालयात धडकले आहे. या पत्राने बंडखोर गटासमोर कायदेशीर पेच उभा केला आहे.
पक्षाच्या अधिकृत भूमिकेनुसार, निवडून आलेले सर्व १० नगरसेवक पक्षाच्या शिस्तीत बांधलेले असून '१० जणांचाच गट' अधिकृत असेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
कायघाचे चौकट नगरसेवकांवर अपात्रतेची टांगती तलवार?
महाराष्ट्र नगरपरिषद अधिनियम १९६५ आणि पक्षांतर बंदी कायद्यानुसार, राजकीय पक्षाचा 'एबी फॉर्म' घेऊन निवडून आलेले सदस्य पक्षाच्या आदेशाला बांधील असतात.
थेट मुंबईतून जिल्हाधिकारी कार्यालयात व्हिप.
जर पक्षाने प्रतोद नियुक्त केला, तर आता ८ नगरसेवकांना पक्षाच्या आदेशाचे उल्लंघन करणे महागात पडू शकते.
'आम्ही २/३ पेक्षा जास्त
आहोत,' असा दावा बंडखोर करत असलेतरी, जोपर्यंत ते अधिकृतपणे पक्षात फूट पाडून बाहेर पडत नाहीत किंवा दुसऱ्या पक्षात विलीन होत नाहीत, तोपर्यंत त्यांना मूळ पक्षाचा आदेश पाळावाच लागतो.
आता खेळ जिल्हाधिकाऱ्यांच्या कोर्टात.
जिल्हाधिकारी सावन कुमार यांनी अद्याप या ८ जणांच्या गटाला अधिकृत मंजुरी दिलेली नाही. जिल्हाधिकारी आता या ८ पक्षाच्या ३० डिसेंबरच्या पत्रानंतर सदस्यांच्या अर्जावर काय निर्णय घेतात, हे महत्त्वाचे आहे. कायद्यानुसार, पक्षाच्या मुख्य कार्यालयाचे जिल्हाधिकाऱ्यांसाठी अंतिम पुरावा मानले जाते. पत्र
नगराध्यक्षांच्या पदग्रहणाकडे पाठ.फिरवली.
१ जानेवारीला नगराध्यक्ष इंजिनिअर सागर गभने यांच्या पदग्रहण सोहळ्याकडे या ८ त्यांच्या तीव्र नाराजीचे लक्षण मानले नगरसेवकांनी पाठ फिरवली, हे जात आहे. मात्र, ही अनुपस्थिती त्यांना भविष्यातील उपाध्यक्ष निवड आणि स्वीकृत सदस्य निवडीमध्यें तांत्रिकदृष्ट्या अडचणीत आणू शकते.
पुढचा रस्ता खडतर.
तुमसरमध्ये सध्या दोन विरुद्ध आठ' असा सामना रंगला असला, तरी अंतिम रिमोट कंट्रोल' मुंबईतील नेत्यांच्या हातात आणि जिल्हाधिकाऱ्यांच्या स्वाक्षरीमध्ये 'राजकीय सस्पेन्स' आता कोणत्या दडलेला आहे. नव्या वर्षातील हा वळणावर थांबतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरेल.
आजची मोठी चर्चा: पक्षाचे घड्याळ १० वर, पण नगरसेवकांचे काटे ८ वरचः कोण कोणाला 'टाईम' दाखवणार?
0 Response to "तुमसर नगरपरिषदेत 'घडी'चे काटे फीरले उलटे!..B"
एक टिप्पणी भेजें