अर्जुनी-मोर.पंचायत समितीत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडून नववर्षाचे जल्लोषात स्वागत.
शुक्रवार, 2 जनवरी 2026
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वुत्तपत्र प्रतिनिधी.
भंडारा :- पंचायत समिती अर्जुनी-मोर. कार्यालयात सरते वर्ष २०२५ ला निरोप देत नववर्ष २०२६ चे जल्लोषात स्वागत करण्यात आले. गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पंचायत समितीतील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी सभापती कार्यालयात येत नववर्षाचे उत्साहात स्वागत केले. याप्रसंगी गटविकास अधिकारी पल्लवीताई वाडेकर यांच्या नेतृत्वाखाली पंचायत समितीचे सभापती आम्रपालीताई डोंगरवार, उपसभापती संदीप कापगते तसेच पंचायत समिती सदस्य
नुतनलाल सोनवाने, शालिनीताई डोंगरवार, पुष्पलताताई दृगकर व इतर सदस्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले. अधिकारी व कर्मचारी यांच्यात उत्साहाचे वातावरण दिसून आले. कार्यक्रमावेळी सभापती आम्रपालीताई डोंगरवार यांनी सर्वांना नववर्षाच्या शुभेच्छा देताना सांगितले की, नववर्ष २०२६ हे पंचायत समितीच्या सर्वांगीण व पारदर्शक विकासासाठी महत्त्वाचे ठरणार आहे. पंचायत समिती अंतर्गत येणाऱ्या ७१ ग्रामपंचायतींच्या विकासासाठी अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांनी समन्वय, सहकार्य आणि पारदर्शकतेच्या माध्यमातून काम करणे आवश्यक आहे, असे त्यांनी नमूद केले. तसेच पंचायत समिती कार्यालयात विविध कामांसाठी येणाऱ्या नागरिकांची कामे वेळेत, नियमबद्ध व पारदर्शक एकत्र पद्धतीने पूर्ण व्हावीत, यासाठी सर्वांनी सकारात्मक दृष्टिकोनातून कार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमामुळे पंचायत समितीतील अधिकारी, कर्मचारी व लोकप्रतिनिधी यांच्यातील सुसंवाद अधिक दृढ झाला असून, नववर्षात विकासाभिमुख कार्य करण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.
0 Response to "अर्जुनी-मोर.पंचायत समितीत कर्मचारी व पदाधिकाऱ्यांकडून नववर्षाचे जल्लोषात स्वागत."
एक टिप्पणी भेजें