-->
अड्याळ येथे गुप्ता प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन.

अड्याळ येथे गुप्ता प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन.


"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी 

अडयाळ :- जनता शिक्षण संस्था द्वारा संचालित गुप्ता प्राथमिक शाळा अड्याळ येथे वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन दिनांक 29 जानेवारी ते 30 जानेवारी 2026 पर्यंत केले आहे. गुरुवार दिनांक 29 जानेवारी 2026 रोज गुरुवार ला वार्षिक स्नेहसंमेलनाचे उद्घाटन सकाळी 11 : 00 वाजता 
पंचायत समिती पवनी चे गट शिक्षणाधिकारी एस. बी. वासनिक , संस्थाअध्यक्ष हरिहर कुर्झेकर , माजी जि. प. सदस्य डॉ. उल्हास हरडे , उपसरपंच शंकर मानापुरे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. कार्यक्रमाला पवनी पं. स. सदस्य सीमा गिरी, संस्थासचिव विपिन कुर्झेकर , संस्थाकोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर , सामाजिक कार्यकर्ते सुनील पोटवार, माजी मुख्याध्यापक अनिल हरडे, माजी सहा. शिक्षिका मीनाकुमारी मेश्राम , अध्यक्ष शाळा व्यवस्थापन समिती अरुण देशमुख , उपाध्यक्ष ममता खंडाईत, शिक्षणतज्ज्ञ पुरुषोत्तम घारगडे, ग्रामपंचायत सदस्य विपिन टेंभुर्णे, शाळा व्यवस्थापन समिती सदस्य पंकज वानखेडे, अनिल शेंडे, खुशाल गभने, रुची लारोकर, सपना काटेखाये, रजनी बोरकुटे, कविता देशमुख तसेच ज्येष्ठ नागरिक शरद शिवरकर उपस्थित राहतील . सकाळी 11: 00 वाजता प्रेक्षणीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच दुपारी 02 : 00 वाजता विद्यार्थ्यांचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. शुक्रवार दिनांक 30 जानेवारी 2026 रोज शुक्रवार ला वार्षिक स्नेहसंमेलनाचे बक्षीस वितरण सकाळी ११ वाजता माजी जिल्हा परिषद सदस्य देवेंद्र हजारे, संस्था कोषाध्यक्ष शुभम कुर्झेकर , केंद्रप्रमुख संतोष मडावी, ग्रा. सदस्य मनोरमा मडावी , सर्व अंगणवाडी सेविका तथा मदतनीस यांच्या उपस्थितीत बक्षीस वितरणाच्या कार्यक्रम पार पाडला जाईल. लगेच विद्यार्थ्यांकरिता स्नेह भोजनाच्या आयोजन करून कार्यक्रमाच्या समारोप करण्यात येईल. गुप्ता प्राथमिक शाळा च्या मुख्याध्यापिका सौ. उषा ढेंगे , सहाय्यक शिक्षक नितीन वाणी, सहाय्यक शिक्षिका सौ. जयश्री हटवार, सहाय्यक शिक्षिका सौ. स्वाती भोवते, विद्यार्थी प्रतिनिधी महीम बेलखोडे तसेच विद्यार्थिनी प्रतिनिधी कु. अक्षरा पंकज वानखेडे , शाळा मदतनीस व्यंकट वंजारी , सौ. सुरेखा ढवळे यांनी वार्षिक स्नेहसंमेलनाला विद्यार्थ्यांनी - पालकांनी उपस्थित रहावे, असे आवाहन केले आहे.

0 Response to "अड्याळ येथे गुप्ता प्राथमिक शाळेचे वार्षिक स्नेहसंमेलन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article