कविता
शनिवार, 24 जनवरी 2026
Comment
जिभा कापल्या बोलतांना..
त्या बाबाला आम्ही काय दिल व माय हायना खर ,
लागले भराया आपलेच घर व, माय हायना खर. (धृ )
कमरेला झाडू , चालतांना
जिभा कापल्या, बोलतांना
हायना खर. -१-
तुमचा आमचा झाला उधार
निच्च रूढीचा,गाडला भार
हायना खर. -२-
भयानक होतो,अंधारी रात
तेव्हा नव्हती कुणाची साथ
हायना खर. -३-
गौतम हा नाही राहिला गुलाम
करती बघा आज झुकून सलाम
हायना खर. -४-
कवी, पञकार गौतम धोटे
आवारपूर, जी,चंद्रपूर(म.हा.)
0 Response to "कविता "
एक टिप्पणी भेजें