- कवीता -
मंगलवार, 27 जनवरी 2026
Comment
कवी गौतम धोटे
( चाल कुणी नाही केल भल व माय )
२६ जानेवारीला लुटू सोनव माय हायना खर
नको दिवाळी नको होळीव माय हायना खर
बाबा भिमान आज या दिनी
घातली नसात कायद्याची वाणी
केली सुवर्ण भारत माथाव माय
हायना खर -१-
जेव्हा सांजेला नव्हत पिट
पाणी पिऊण भरल पोठ
हे सविधान लिहिल मोठव माय
हायना खर -२-
दिल मिळवून आम्हा सार
झाला भीमराव हा कोहिनूर
शिकुन कुणी अर्ध्यात रूकलेव माय
हायना खर -३-
अस हे मजबुत हे सविधान
लिहील गौतम माझ्या भीमान
एका धाग्यात त्यांन बांधलव माय
हायना खर -४-
कवी पञकार गौतम धोटे
आवारपूर ९६३७७०८५९३
0 Response to "- कवीता -"
एक टिप्पणी भेजें