-->
माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म परिषद.

माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म परिषद.

  

• दशबल पहाडी, सितेपार / हत्तीडोई (ता. जि. भंडारा) येथे आज रविवार,

भंडारा/तुमसर :- दि. ०१ फेब्रुवारी २०२६ रोजी आयोजन दशबल पहाडी भिक्खू संघ, सितेपार / हत्तीडोई यांच्या वतीने आयोजित बौद्ध धम्म परिषद (वर्ष ३२ वे)

चक्रवर्ती सम्राट अशोककालीन ऐतिहासिक व निसर्गरम्य दशबल पहाडी परिसरात माघ पौर्णिमेच्या पावन दिनानिमित्त तथागत गौतम बुद्धांच्या शांती, करुणा व समतेच्या धम्माचा प्रचार-प्रसार करण्याच्या उद्देशाने भव्य धम्म परिषद आयोजित करण्यात आली आहे.
माघ पौर्णिमेला भगवान बुद्धांनी सारिपुत्र व महामोग्गलायन यांची सेनापती म्हणून नियुक्ती केली तसेच आपल्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली. म्हणूनच हा दिवस महापरिनिर्वाण घोषणा दिन म्हणून ओळखला जातो. या ऐतिहासिक दिनाचे औचित्य साधून सदर परिषद होत आहे.
             • कार्यक्रमाची रूपरेषा •
▪ सकाळी ८.३० वा. – पंचशील ध्वजारोहन
▪ ९.०० वा. – परित्राण
▪ १०.०० वा. – भिक्खू संघास भोजनदान
▪ १०.३० वा. – धम्मदेशना
▪ १२.०० वा. – उपासक-उपासिकांना भोजनदान
▪ १२.१५ वा. – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना व बुद्ध-भीम गीतांचा कार्यक्रम
🔸 धम्मदेशना : भिक्खू डॉ. चिंचाल मेत्तानंद (M.Phil, Ph.D, Gold Medalist) व भिक्खू संघ, बोधगया (बिहार)
या मंगल प्रसंगी विविध मान्यवर, भिक्खू-भिक्खूनी संघ तसेच सामाजिक कार्यकर्त्यांची उपस्थिती लाभणार आहे.

 तरी सर्व बुद्ध धम्म अनुयायी, उपासक-उपासिका व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धम्मदेशनेचा लाभ घ्यावा,असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात येत आहे.
— डॉ.प्रा.देवानंद बि.नंदागवळी.

0 Response to "माघ पौर्णिमा वर्धापन दिनानिमित्त बौद्ध धम्म परिषद. "

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article