राज्य महिला आयोगातर्फे मंगळवारी जनसुनावणी.
शुक्रवार, 13 फ़रवरी 2026
Comment
हर्षवर्धन देशभ्रतार
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष रुपाली चाकणकर मंगळवारी (ता. १७) जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून, त्यांच्या अध्यक्षतेखाली सकाळी ११ वाजता नियोजन भवन भंडारा येथे जनसुनावणी घेण्यात येणार आहे. या सुनावणीवेळी जिल्ह्यातील पीडित महिला कोणतीही पूर्वसूचना न देता प्रत्यक्ष सुनावणीस उपस्थित राहून आपली मालमत्ताविषयक/कौटुंबिक हिंसाचार व इतर प्रकरणातील समस्या लेखी स्वरुपात आयोगापुढे मांडू शकतील, असे जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी अरूण बांदूरकर यांनी कळविले आहे.
0 Response to "राज्य महिला आयोगातर्फे मंगळवारी जनसुनावणी."
एक टिप्पणी भेजें