सौ.शामल नारायण धावारे यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली.
सोमवार, 2 फ़रवरी 2026
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
रायगड :- डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजी नगर यांच्याकडून शामल धावारे ( उर्फ सौ . शामल बबन भोईर ) यांना पीएच.डी. पदवी प्रदान करण्यात आली . त्यांनी गेल्या दशकातील महिलांच्या कथांमधील बदलती स्त्री मानसिकता या विषयावर आपला शोध प्रबंध सादर केला होता . त्यांना नुकतीच विद्यापीठाकडून पीएच.डी. मिळाली असून त्यांनी हे काम डॉ . अश्विनीकुमार चिंचोलीकर यांच्या मार्गदर्शनाखाली केले आहे त्यांच्या या यशाबद्दल डॉ . संजय राठोड , हिंदी विभाग प्रमुख , डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ , छत्रपती संभाजी नगर , डॉ . सुधाकर शेंडगे , मार्गदर्शक डॉ . अश्विनी कुमार चिंचोलीकर , राजीव गांधी कला , वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालय करमाड , डॉ.अपर्णा पाटील , प्रतिष्ठान महाविद्यालय पैठण , डॉ . देविदास गोपाळ बोरडे , हिंदी विभाग , सावंतवाडी , डॉ . शेख आझम , डॉ . सुधाकर चव्हाण , बबन गोपाळ भोईर , मनोज काळे तसेच विविध सामजिक, शैक्षणिक , साहित्यीक संस्थानाचे सहकार्य , मार्गदर्शन लाभले आहे व दलित पँथर रायगड जिल्हा अध्यक्ष मनोज गायकवाड आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सुद्धा कौतुक केले. व या कार्याचे विविधस्तरातून अभिनंदन करण्यात येत आहे .
0 Response to "सौ.शामल नारायण धावारे यांना पी.एच.डी पदवी प्रदान करण्यात आली. "
एक टिप्पणी भेजें