चिंचोली येथे तीन दिवसीय धम्म आचरण व ध्यान साधना शिबिर
बुधवार, 25 फ़रवरी 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
चिंचोली/नागपूर :- भगवान बुद्धांना समर्पित तीन दिवसीय धम्म आचरण व ध्यान साधना शिबिराचे आयोजन शांतिवन धम्मजय बुद्ध विहार, चिंचोली येथे १ मार्च ते ३ मार्च २०२६ दरम्यान करण्यात आले आहे. धम्मकाया फाउंडेशन थायलंडच्या मार्गदर्शनाखाली आयोजित या शिबिरात सहभागी साधकांना ध्यान, धम्म आचरण व आध्यात्मिक मार्गदर्शनाचा लाभ मिळणार आहे.
शिबिरादरम्यान १ मार्च रोजी २५५ देशांच्या सहभागातून विशेष आमिष पूजा थायलंड येथून थेट प्रक्षेपित केली जाणार आहे. तसेच ३ मार्च रोजी माघ पूर्णिमा निमित्त सायंकाळी ४.३० ते ६.३० या वेळेत धम्मकाया टेंपल, थायलंड येथून विशेष पूजा लाईव्ह दाखविण्यात येणार आहे.
शिबिरार्थींसाठी निवास व भोजनाची मोफत व्यवस्था करण्यात आली असून, शिबिरासाठी केवळ ५० जागा उपलब्ध आहेत. सहभागी होण्यासाठी वयोमर्यादा १८ ते ६० वर्षे ठेवण्यात आली आहे. नाव नोंदणीची अंतिम तारीख २७ फेब्रुवारी २०२६ असून, शिबिरार्थींसाठी २८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजेपर्यंत रिपोर्टिंग आवश्यक आहे.
नाव नोंदणी व अधिक माहितीसाठी संजय पाटील (मो. ९३७१२७०६४९), वर्षा वासनिक (मो. ७५५९११५२२५) व समाधान तिरपुडे (मो. ८४२१३८४०९५) यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन आयोजकांनी केले आहे.
हे शिबिर ध्यान साधनेद्वारे मानसिक शांतता, आत्मिक उन्नती व धम्म आचरणाची सखोल अनुभूती देणारे ठरणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली.
0 Response to "चिंचोली येथे तीन दिवसीय धम्म आचरण व ध्यान साधना शिबिर "
एक टिप्पणी भेजें