-->
दवडीपार बाजार येथे निरोप समारंभ कार्यक्रमाची सांगता.

दवडीपार बाजार येथे निरोप समारंभ कार्यक्रमाची सांगता.

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- दवडीपार बाजार येथील आदर्श विद्यालय येथे दिनांक १४ फेब्रुवारी २०२६ रोजी शनिवारला वर्ग ९ वी कडून १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप समारंभाचा कार्यक्रम देण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्ष शाळेतील मुख्याध्याक मा. मारोती लांजेवार सर यांना देण्यात आले असून जेष्ठ शिक्षिका कांता कामथे, मा शशांक धुर्वे सर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडण्यात आला. वर्ग ९ वी च्या विद्यार्थ्यांकडून वर्ग १० वीच्या विद्यार्थ्यांना निरोप देण्यात येऊन पुढील वाटचालीबाबत शुभेच्छा देण्यात आल्या. 
मा. अध्यक्ष मारोती लांजेवार सर, मा शशांक धुर्वे सर, मा विनोद राठोड सर, सनराईज कंप्युटर पहेला चे संचालक श्री. विलास बांडेबुचे यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेत व शुभेच्छा दिल्यात. सनराईज कंप्युटर कडून सराव परीक्षेत पहिल्या तीन विद्यार्थ्यांना रोख बक्षीस देण्यात आले. लकी थोटे, आयुषी वैद्य, श्रद्धा लांजेवार, रमाकांत धुर्वे या विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे संचालन कु. गायत्री वाघाडे या विद्यार्थिनींनी केले तर आलेल्या पाहुण्यांचे आभार श्रेयश टिचकुले यांनी मानले. 
उपरोक्त प्रसंगी ग्रामविकास बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे सहसचिव मा.अशोकजी धुर्वे, उपाध्यक्ष मा. चिंतामनजी हजारे, सद्स्यां मा. आशाताई धुर्वे व शाळेतील सर्व शिक्षकवृंद- शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.

0 Response to "दवडीपार बाजार येथे निरोप समारंभ कार्यक्रमाची सांगता."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article