कविता
गुरुवार, 19 फ़रवरी 2026
Comment
. कवी पत्रकार गौतम धोटे
संकलन/संग्रहक
हर्षवर्धन देशभ्रतार
स्वाभिमान व स्वराज्याची ज्योत मी.
गिताची कल्पना)जोतिबांनी शिवराय शोधले, म्हणून आज शिवराय घराघरांत पोहोचले !!..
(शतकांच्या यज्ञातून उठली एक केशरी ज्वाला... दहा दिशांच्या हृदयांमधुनी
अरुणोदय झाला...!!
छत्रपती शिवाजी महाराज-- पराक्रम एवढा की इतिहास थरथरला, कीर्ती एवढी की शतकं गाजली... माणुसकी एवढी गहिरि, की रयत आजही त्यांना "राजे" म्हणतात-मनापासून, अभिमानाने छत्रपती शिवाजी महाराजांचे मोठेपण किंवा कर्तृत्व एका देशापुरते किंवा राज्यापुरते व एका जातीत मर्यादित नाही, तर ते वैश्विक पातळीवरील आहे. शिवजयंतीनिमित्त या पैलूवर टाकलेला खालील गितातून अल्पसा प्रकाश...
(चाल :- कुंकू लावील रमान)
जमला सगळा हा गांव
आहे जयंतीच नाव -धृ-
लावी तोरंन घरी दारी
तया रेशमाची दोरी
घेई शिवाचे हे नाव -१-
जशा चंद्राचा हा चकोरा
तेव्हा तो शिवबाचा दरारा
बोले शिवा_भीवा देव -२-
शिवा आयुष्याचा गोजिरा
या झाला"जन्माने"उध्दारा
मेवा मिठाईवर ताव -३-
शुभ कार्य आज करण्या,
आला गौतम विधी घेण्या
ठेवा मिठाईचा ठाव -४-
कवी पञकार गौतम धोटे
आवारपर
होती.धर्मशुद्धी, राजकारणातील
बुद्धिमत्ता, रणनीतीतील कौशल्य
आणि रणांगणातील पराक्रम हे
शिवछत्रपतींचे गुण आठवणे
आजही आवश्यक आहे.!
ती शुध्दि हेतुचि कर्मी-राहु दे
ती बुध्दि भाबड्या जीवां-लाहु दे
ती शक्ती शोणितामाजी-वाहु दे
दे पुन्हा मंत्र तो दिलें समर्थे
तुज राहु दे.!
शुद्ध हेतूने केलेले कर्म राहू दे,
भाबड्या जिवास बुद्धी लाभू दे,
मातृभूमीसाठी रक्तरंजित पराक्रम
करण्याची शक्ती या समाजास वाहू दे.
0 Response to "कविता"
एक टिप्पणी भेजें