-->
आज मातंग समाजाचा मोर्चा अनुष्का पाटोळे यांच्या न्याय मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.

आज मातंग समाजाचा मोर्चा अनुष्का पाटोळे यांच्या न्याय मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार.


साप्ताहिक जनता की आवाज" 
वुत्तपत्र प्रतिनिधी.

लातूर :- जिल्ह्यातील टाका गावातील मातंग समाजाच्या मुलीच्या मृत्यू प्रकरणाने आता संतापाचा उद्रेक झालेला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण जिल्ह्यात रोषाचे वातावरण निर्माण झाले आहे. लातूर येथील जवाहर नवोदय विद्यालय लातूर येथे घडलेल्या संशयास्पद घटनेनंतर मातंग समाजात भीती, संताप आणि संशयाचे वातावरण पसरले आहे.

मातंग समाजाच्या म्हणण्यानुसार, नवोदय विद्यालयासारख्या प्रतिष्ठित आणि शिस्तबद्ध शिक्षण संस्थेत अशी कोणती घटना घडली होती की ज्यामुळे हा दुर्दैवी घात घडला? या घटनेमागचे खरे कारण काय होते? त्या दिवशी नक्की काय घडले होते? असे अनेक प्रश्न आजही अनुत्तरित आहेत. या प्रश्नांची उत्तरे मिळावी, दोषींवर कारवाई व्हावी यासाठी शासनाने एसआयटीची नेमणूक केली. मात्र जवळपास दोन महिने उलटून गेले तरी तपासातून

कोणतीही ठोस सत्यता समोर आलेली नाही.

समाजामध्ये अशी तीव्र भावना

निर्माण झाली आहे की, तपास मुद्दाम लांबवला जात आहे. ङ्गजर तपास प्रामाणिक असेल तर दोन महिन्यांत सत्य समोर यायला हवे होते असा संतप्त सवाल समाजातून विचारला जात आहे. या प्रकरणात प्रशासनाच्या भूमिकेवरही गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.

या नवोदय विद्यालयाचे अध्यक्ष म्हणून जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कार्य पाहतात. त्यामुळेच या प्रकरणात निष्पक्ष तपास होईल का, असा संशय समाजात व्यक्त होत आहे. प्रशासन स्वतःच व्यवस्थापनात असताना सत्य बाहेर येण्यास अडथळे निर्माण होत आहेत का? असा

थेट आरोप समाजातून केला जात आहे. त्यामुळेच या घातपाताचा अद्याप उलगडा झालेला नाही, असे समाजाचे म्हणणे आहे.

या प्रकरणात एसआयटी देखील आरोपींचा शोध लावण्यात अपयशी ठरली असल्याचा आरोप आता उघडपणे केला जात आहे. दोन महिने उलटूनही गुन्हेगार मोकाट फिरत असतील, तर तपास यंत्रणा नेमकी काय करत आहे? असा संतप्त प्रश्न नागरिकांकडून विचारला जात आहे. या प्रकरणात दोषींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा संशय समाजात अधिकच बळावत आहे.

या पार्श्वभूमीवर सकल मातंग समाज आक्रमक भूमिका घेत आज लातूर जिल्हाधिकारी कार्यालयावर भव्य मोर्चा काढत आहे. हा मोर्चा केवळ निषेधासाठी नसून हा न्यायासाठीचा लढा असल्याचे आयोजकांनी स्पष्ट केले आहे.

समाजाच्या वतीने स्पष्ट इशारा देण्यात आला आहे की, हा मोर्चा काढूनही जर शासनाने घात करणाऱ्यांवर कडक कारवाई केली नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रात विविध प्रकारची तीव्र आंदोलने छेडली जातील. राज्यभर रस्ता रोको, धरणे, आंदोलन आणि मोठ्या प्रमाणावर जनआंदोलन उभे करण्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळेच या मोर्चाचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती समाजाच्या वतीने देण्यात आली आहे.

या मोर्चात संपूर्ण लातूर

जिल्ह्यातील मातंग समाजासह बहुजन समाज मोठ्या संख्येने सहभागी होणार असल्याची माहिती समोर येत आहे. युवक, महिला आगि सामाजिक संघटनांचा मोठा सहभाग

असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

न्याय मिळालाच पाहिजे, दोषींना अटक झालीच पाहिजे अशा घोषणा देत मोर्चेकरी प्रशासनाला जाब विचारणार असल्याचे सांगितले जात आहे.

आज हा प्रश्न फक्त एका घटनेपुरता मर्यादित राहिलेला नाही. हा प्रश्न समाजाच्या सुरक्षिततेचा, सन्मानाचा आणि न्यायव्यवस्थेवरील विश्वासाचा बनला आहे. आता शासन आणि प्रशासनाने तात्काळ ठोस कारवाई करावी, अन्यथा जनतेचा रोष प्रचंड स्वरूप धारण करेल, असा इशारा देण्यात आला आहे.

लातूर जिल्ह्यातील ही घटना आता संपूर्ण राज्याचे लक्ष वेधून घेत आहे. पुढील काही दिवसांत शासनाची भूमिका काय राहणार आणि तपासात काय निष्पन्न होणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. हा मोर्चा साहित्य रत्न आण्णा भाऊ साठे यांच्या पुतळ्या पासून सकाळी ११:०० वाजता

निघणार असल्याचे

कव्ळिवण्यात आले आहे.

0 Response to "आज मातंग समाजाचा मोर्चा अनुष्का पाटोळे यांच्या न्याय मागणी साठी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकणार."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article