बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या.
गुरुवार, 12 फ़रवरी 2026
Comment
• बिटि ऍक्ट रद्द करा या प्रमुख मागणी करिता दिल्लीच्या जंतर-मंतरवर भव्य आंदोलन.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
दिल्ली :- आज दिनांक 12 फरवरी 2026 ला दिल्ली येथील जंतर मंतर येथे भंते विनाचार्य यांच्या नेतृत्वात भव्य आंदोलन करण्यात आले. आंदोलनातील प्रमुख मागण्यांमध्ये प्रमुख मागण्या बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावा त्याचप्रमाणे बी टी ऍक्ट 1949 रद्द करण्यात यावा या प्रमुख मागणी करता या आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते .या आंदोलनात लाखो बौद्ध उपासक उपासिका यांनी हजेरी लावली होती. परंतु केंद्रातील व दिल्ली सरकारने आंदोलन कर्त्यांनी जंतर मंतर वर मोठ्या संख्येने गर्दी करू नये म्हणून दिल्लीच्या चारही बाजूला पोलिसांनी नाकाबंदी केली होती. या आंदोलनात मोठ्या संख्येने भिक्खू संघ, मुंबईच्या खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री तथा खासदार चंद्रकांत हांडोरे ,केंद्रीय समाज कल्याण मंत्री रामदास आठवले, भीम आर्मी प्रमुख आजाद समाज पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार चंद्रशेखर आजाद, भंडारा गोंदिया लोकसभेचे खासदार प्रशांत पडोळे ,वर्धेचे खासदार वानखेडे, व इतर मान्यवर यावेळेस प्रामुख्याने आपलं समर्थन दर्शविण्याकरिता उपस्थित होते. या आंदोलनात महामाया महिला सामाजिक संघटनेचे संस्थापक अध्यक्ष डी. जी .रंगारी भंडारा जिल्हा व पदाधिकारी यांनी सुद्धा हजेरी लावली होती..
0 Response to "बोधगया येथील महाबोधी महाविहार बौद्धांच्या ताब्यात द्या."
एक टिप्पणी भेजें