राज्यात अन्न आयोगाचा अनोखा भटके , भिकारी, बेवारस व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अनोखा उपक्रम.
शुक्रवार, 20 फ़रवरी 2026
Comment
• बेवारस, भिकारी,भटके, तृतीयपंथी व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिला यांना शोधून त्यांना धान्य देण्याचे दिले आदेश.
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
सिल्लोड :- दिनांक:-१६ रोजी छत्रपती संभाजी नगर येथे जिल्हाधिकारी कार्यालयात राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांच्या अध्यक्षतेखाली पुरवठा विभागाच्या विविध उपाय योजनेसंदर्भात अत्यंत महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली.
यावेळी या बैठकीला राज्य अन्न आयोगाचे सदस्य सुभाष राऊत, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रविण फुलारी, सहाय्यक जिल्हा पुरवठा अधिकारी संदीप शिंदे,सिल्लोड तहसिल पुरवठा विभागाचे कर्तव्यदक्ष पुरवठा निरीक्षक बळीराम मुंडे, कर्तव्यदक्ष सहाय्यक महसूल अधिकारी आशिष औटी,व जिल्ह्यातील विविध तहसिल कार्यालय पुरवठा विभागाचे पुरवठा निरीक्षक उपस्थित होते.
या महत्त्वपूर्ण बैठकीला मार्गदर्शन करताना अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की, आपल्या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात रस्त्यावर रस्त्याच्या कडेला बेवारस, गरजू, भिकारी, तृतीयपंथी असे लोक आढळतात या लोकांना कोणते प्रकारचा अन्न वस्त्र निवारा मिळत नाही
त्याचबरोबर त्यांना मनातच स्वतःचे घर स्वतःचे अधिकार माहित नसते त्या अशा लोकांसाठी पुरवठा विभागानी असा निर्णय घेतला की,या लोकांना मोफत धान्य, अंत्योदय शिधापत्रिका देऊन त्यांना मायेचा आधार द्यावा तसे आपल्या विभागांनी नियोजन सुरू केले आहे व आपण सुद्धा आपल्या तालुका भरातील अशा लोकांचा शोध घेऊन हे आदर्श व समाजाभिमुख पवित्र काम हाती घेऊन राज्यासमोर एक आदर्श निर्माण करावा त्याचबरोबर आपल्या पोटासाठी काही ज्या वेशा व्यवसाय करतात अशांना सुद्धा आपण एक पुढाकार घेऊन ही मदत करावी
राज्य शासनाच्या वतीने अण्णा योगाच्या माध्यमातून सामाजिक उपक्रम हाती घेतलेला आहे आणि या उपक्रमाला खऱ्या अर्थाने आपण छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातून आपण सुरुवात करीत आहोत आपण सुद्धा कामाला लागावे जास्तीत जास्त अशा लोकांना आपण लाभ द्यावा अशा सूचना यावेळी देण्यात आल्या
या खरोखरच सामाजिक अभिनव उपक्रमाला जिल्ह्याभरात नव्हे परंतु सिल्लोड तालुक्यामधून मोठ्या प्रमाणात रस्त्यावर फिरणाऱ्या भिकारी बेवारस, तृतीयपंथी त्याचबरोबर आपल्या पोटासाठी वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांना सुद्धा मोठ्या प्रमाणात आम्ही लाभ मिळवून देऊ अशा आत्मविश्वास व ग्वाही सिल्लोडचे आदर्श व कर्तव्यदक्ष पुरवठा निरीक्षक बळीराम मुंडे यांनी बैठकीदरम्यान अन्न आयोगाचे अध्यक्ष ढवळे यांना दिला.
सिल्लोड तालुक्यामध्ये सुद्धा पुरवठा विभागाचे काम हे पुरवठा निरीक्षक बळीराम मुंडे यांच्या माध्यमातून अतिशय वेगाने व जोमाने त्याचबरोबर सहाय्यक महसूल अधिकारी आशिष औटी यांच्या सहकार्याने सुरू असून राज्याला नक्कीच आम्ही एक आदर्श निर्माण करून देऊ अशी ग्वाही दिली.
यांच्या या कृतीला व शब्दाला अन्न आयोगाचे अध्यक्ष ढवळे यांनी सुद्धा हिरवा कंदील दाखवला व त्यांच्या कामाची प्रशंसा केली.
0 Response to "राज्यात अन्न आयोगाचा अनोखा भटके , भिकारी, बेवारस व वेश्या व्यवसाय करणाऱ्या महिलांसाठी अनोखा उपक्रम."
एक टिप्पणी भेजें