नागपूर ग्रंथोत्सव 2025 चे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न.
शनिवार, 7 मार्च 2026
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
नागपूर :- महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक धोरण 2010 अंतर्गत उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय महाराष्ट्र राज्य मुंबई, जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर, व वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित नागपूर ग्रंथोत्सव -2025 हा ग्रंथ सोहळा शुक्रवार दिनांक-06 मार्च 2026 रोजी मोठ्या उत्साहात पार पडला. सदर कार्यक्रमाचे उद्घाटक - गणेश मुळे ( संचालक माहिती नागपूर अमरावती ) यांच्या हस्ते करण्यात आले.कार्यक्रमाच्या अध्यक्षा - डॉक्टर संध्या पवार ( ज्येष्ठ साहित्यिक नागपूर ) उपस्थित होत्या. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे - डॉक्टर गजानन कोटे वार ( अध्यक्ष महाराष्ट्र राज्य ग्रंथालय संघ) डॉमनोहर कुंभारे ( संचालक वसंतराव नाईक शासकीय कला व समाज विज्ञान संस्था नागपूर ) कार्यक्रमाच्या मुख्य संयोजिका मीनाक्षी कांबळे( जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय नागपूर ) नंदू बनसोड ( महाराष्ट्र राज्य ग्रंथालय कर्मचारी संघटना ) इत्यादी मान्यवरांच्या हस्ते महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण पूजन दीप प्रज्वलित करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. सदर कार्यक्रमाला रामटेक तालुक्यातील किरणापुर येथील, बुद्ध फुले शाहू चळवळीच्या बुलंद आवाज, प्रबोधनकार भीम शाहीर तथा पत्रकार प्रदीप कडबे ( प्रेरणा सार्वजनिक वाचनालय किरणापुर तालुका रामटेक) यांना त्यांच्या सामाजिक, सांस्कृतिक, ग्रंथालय चळवळीतील, पत्रकारितेतील , भरीव कार्याची दखल घेऊन विवेकानंदाचे चरित्र पुस्तक भेट देऊन जाहीर सत्कार करण्यात आला. सदर कार्यक्रमात - एकपात्री नाट्य प्रयोग : लोकमाता अहिल्याबाई होळकर प्रस्तुत सादरकर्त्या - दीप लक्ष्मी भट यांनी नाटिका सादर केली. त्यांना पुस्तक भेट देऊन त्यांच्या जाहीर सत्कार करण्यात आला. यावेळी पत्रकार डॉक्टर अतुल लामसोंगे, गुरुदास डोंगरे, सागर लोंढे, कैलास समरीत, कंठीराम दंढारे , उमाकांत देशमुख, जीव तू चव्हाण, शिवाजी कांबळे, भीमराव बाराहाते, तुषार राखडे, संजय नारनवरे, संघपाल डोंगरे, दिपराज भोवते, चिंतामण राऊत, लव जनबंधू, दीपक मोहोळ, जागेश्वर गजभिये, सुनील बादुले, न.दा. वाहने, डॉक्टर रमेश जनबंधू, दर्शना मस्के, दुर्गा लोंढे, सारिका बोरकर, वंदना रामटेके, प्रभू दामले, प्रबोधनकार भीमशाहिर तथा पत्रकार प्रदीप कडबे, ग्रंथोत्सवाचे मुख्य आयोजिका - मीनाक्षी कांबळे जिल्हा ग्रंथालय अधिकारी नागपूर, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन, मंजुश्री डोंगरे यांनी केले. आभार प्रदर्शन मीनाक्षी कांबळे यांनी केले. मोठ्या संख्येने ग्रंथालय कार्यकर्ते, ग्रंथालय कर्मचारी, ग्रंथ प्रेमीवाचक, मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "नागपूर ग्रंथोत्सव 2025 चे थाटात उद्घाटन सोहळा संपन्न. "
एक टिप्पणी भेजें