-->
पवनी तालुक्यातील चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर.

पवनी तालुक्यातील चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर.



• नाविन्यपूर्ण उपक्रमाचे करण्यात आले होते आयोजन. 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- पवनी तालुक्यातील चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान व नावीन्यपूर्ण उपक्रमाचे आयोजन 24 मार्च 2026 ला करण्यात आले होते .या शिबिरात भोगवटदार वर्ग दोन चे वर्ग एक मध्ये रूपांतर ,जिवंत सातबारा टप्पा एक, जिवंत सातबारा टप्पा दोन, सामाजिक अर्थसहाय्य योजना तुकडे बंदी कायदेविरुद्ध व्यवहार नियमानुकूल करणे, दाखले प्रमाणपत्र वितरण, सर्वांसाठी घरे पट्टे वाटप ,प्रलंबित फेरफार डिजिटल स्वाक्षरीचे सातबारा व आठ अ वितरण, अधिकार अभिलेख दुरुस्ती दाखले प्रमाणपत्र करिता अर्ज स्वीकारणे, ई मोजणी अर्ज स्वीकारणे तसेच मोजणी नकाशा पांदण रस्ते प्रशासकीय मान्यता आदेश वितरण ऍग्री टेक व पी एम किसान नोंदणी ,अकृषक आदेश निर्गमित प्रकरणात कजाप तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे ,भूसंपादन प्रकरणात कजाप तयार करून गाव दप्तर अद्यावत करणे, त्याचप्रमाणे नवीन नावीन्यपूर्ण उपक्रम सदर शिबिरात राबविण्यात आले. यात प्रामुख्याने समर्पण ब्लड बँक भंडारा अंतर्गत 22 लोकांनी रक्तदान केले. 120 लोकांची नेत्र तपासणी, तीन प्रकल्पग्रस्त प्रमाणपत्र वाटप ,एसटी विभागाचे स्मार्ट कार्ड वाटप संख्या ३३ ,आयुष्यमान कार्ड वाटप ३३, वयवंदना कार्ड १८, आबा कार्ड 3४ ,लक्ष्मी मुक्ती योजनेअंतर्गत १९ महिलांचे नाव सातबारावर सहधारक म्हणून दर्जा करून आदेश वाटप करण्यात आले. या शिबिरात एकूण ७८५ लाभार्थ्यांनी लाभ घेतला.यावेळी प्रशांत पडघन उपजिल्हाधिकारी भंडारा, किशोर राऊत ,शुभदा धुर्वे नायब तहसीलदार, कापसे उपअधीक्षक भूमी अभिलेख, जी.बी अंबुले मंडल अधिकारी, सर्व तलाठी व कोतवाल चिचाळ मंडळ ,सरपंच चिचाळ पाथरी, सर्व विभागाचे कर्मचारी, आशा सेविका, अंगणवाडी सेविका ,पोलीस पाटील ,तंटामुक्तीचे अध्यक्ष व विद्यार्थी महिला ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "पवनी तालुक्यातील चिचाळ येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराज्यस्व समाधान शिबिर."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article