-->
संकटात धीर ठेवा... अंधश्रद्धेच्या बाजारापासून सावध रहा...!

संकटात धीर ठेवा... अंधश्रद्धेच्या बाजारापासून सावध रहा...!

.                महंत गोपालव्यास कपाटे
                         (महानुभाव) 

      हर्षवर्धन देशभ्रतार 
"साप्ताहिक जनता की आवाज"  
 
भंडारा :- नासिकमध्ये समोर आलेल्या अशोक खरात प्रकरणाने पुन्हा एकदा समाजाला मोठा धक्का दिला आहे, अशा घटना केवळ एका व्यक्तीपुरत्या मर्यादित नसतात. तर त्या आपल्या सामाजिक मानसिकेचा आरसा असतात. अडचणीच्या, संकटाच्या काळात माणुस भावनिकदृष्ट्या कमकुवत होतो. आणि याच क्षणाची वाट भोंदूगिरी करणारे बाबा, गुरू, मांत्रिक आमवस्या, पौर्णिमेला दरबार भरवणारे भोंदू, बाबा, बुवा पुढे येतात,. भारतामध्ये अनेक ठीकाणी "आश्रम संस्कृतींमध्ये प्रमाणावर वाढलेली दिसते. पण कटु वास्तव असे आहे की जिथे भक्ती असायला हवी तिथे अनेकदा "बाजार" भरलेला दिसतो धर्म, श्रध्दा, आणि आध्यात्म यांच्या नावाखाली एक वेगळाच व्यवहार सुरू असतो. एक महत्वाचा मानसिक खेळ येथे दिसतो. प्रत्येकाला वाटतं "माझी ती भक्ति आहे "आणि दुसऱ्याचा तो बाजार आहे. याच चुकीच्या समजुतीतून लोक हळुहळु त्या अंधश्रद्धेत, व कर्मकांडाच्या बाजारात ओढले जातात. सुरवातीला श्रध्दा, त्यानंतर अलींबनत्व आणि शेवटी अडकनं हा क्रम अनेक ठीकानी अडचणीत सापडलेल्या व्यक्तीला "विषेश उपाय सांगीतले जातात" भावनिक व मानसिक प्रभाव टाकून विश्वास जिंकला जातो.... हळूहळू त्या व्यक्तीला पर्याय नसल्यासारखी परिस्थिती निर्माण होते... आणि मग सुरू होतो शोषनाचा खेळ... याआधी आसाराम बापू.... राम रहीम... सारख्या घटनांनी हे स्पष्ट केलं आहे की अंधश्रद्धेचा शेवट अनेकदा अत्यंत वाईट होतो. सर्वात महत्वाचा संदेश.... अडचणीच्या काळात संकटग्रस्त काळात कोनत्याही भोंदू बाबा बुवांच्या नादी लागु नका, धीर धरा, विचार करा आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्याचा प्रयत्न करा, त्यात नक्की यश मिळेल.... वेळ कधीच सारखी राहात नाही, वाईट काळ कायमचा नसतो, तो निघुन जातो, पण चुकीचा निर्णय घेतला तर त्याचे परीणाम दीर्घकाळ भोगावे लागतात. संकटकाळात घाईघाईने निर्णय घेवू नका, कुटुंब, मित्र, आणि तज्ञांचा सल्ला घ्या... कायदा, वैद्यकीय व्यवस्था आणि अधिकृत मार्गावर विश्वास ठेवा, कोनत्याही व्यक्तीला अलौकिक शक्ती देवू नका. हे प्रकरण केवळ अशोक खरात यांचे पुरते मर्यादित नाही. समाजासाठी मोठा धडा आहे, संपुर्ण समाजाला विचार करायला भाग पाडनारे आहे, आपन श्रध्दा आणि अंधश्रद्धा यात फरक करतो का, आपन साथा विचार करतो का की आपन कुनाच्या मागे अंधपनाने चालतोय, जिवनात संकटे, समस्या येणारच, पण त्यावर उपाय "बाजारात मिळत नाही. तो मिळतो धैर्य, संयम, आणि योग्य निर्णयात स्वतःवर विश्वास ठेवा... वेळेला संधी द्या. आणि सर्वात महत्वपूर्ण अंधश्रद्धा, कर्मकांडाच्या जाळ्यात फसू नका. अडकू नका. कारण जिथे भक्तिपेक्षा बाजार जास्त असतो. तिथे शेवटी नुकसान फक्त सामान्य जनांचेच होते.. जय श्रीकृष्ण दंडवत प्रणाम * महंत. श्री. गोपालव्यास कपाटे महानुभाव


0 Response to "संकटात धीर ठेवा... अंधश्रद्धेच्या बाजारापासून सावध रहा...!"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article