-->
मनिकाचा साधा दमदार फिटनेस फॉर्म्युला...

मनिकाचा साधा दमदार फिटनेस फॉर्म्युला...

.                         मनिका विशकर्मा

 
मिस यूनिवर्स २०२५ चा ताज जिंकून देशाचं नाव जगभरात उज्ज्वल करणारी मनिका विश्वकर्मा फक्त तिच्या सौंदर्यासाठीच नव्हे तर तिच्या स्लिम, टोन्ड फिगरसाठीही विशेष प्रसिद्ध आहे. आंतरराष्ट्रीय सौंदर्यस्पर्धेची तयारी करणाऱ्या स्पर्धकांना कडक डाएट फॉलो करावं लागतं असा समज असतो.

मात्र, मनिका या समजाला पूर्णपणे खोटं ठरवते. तिचा फिटनेस रूटीन अगदी साधा, सोपा आणि सहज पाळता येणारा आहे. इतकंच नव्हे तर तिला आवडणारे छोले-भटूरे, चाऊमीन आणि गोलगप्पे खाऊनही ती तंदुरुस्त कशी राहते? याचं उत्तर तिने स्वतः एका मुलाखतीमध्ये दिलं आहे.

मनिकाने तिच्या डाएट आणि दिनचर्येबद्दल सांगताना म्हटलं की, 'माझ्यासाठी फिटनेस म्हणजे महागडे सप्लिमेंट्स किंवा खर्चिक डाएट नाही. मी फक्त एक हेल्दी लाइफस्टाइल फॉलो करते आणि हे मी लहानपणापासूनच करते आहे.'

तिने पुढे सांगितलं की, 'जगातल्या सर्वात चांगल्या जेवणात घरचं अन्न पहिल्या क्रमांकावर येतं.

घरच्या जेवणातून प्रोटीन, व्हिटॅमिन्स आणि शरीराला लागणारी प्रत्येक गोष्ट मिळते. माझ्या आई-वडिलांनी मला कायम हेल्दी फूड दिलं आणि माझ्या डाएटची काळजी घेतली. ते दोघेच माझे लाइफटाइम डाएटिशियन आहेत.

0 Response to "मनिकाचा साधा दमदार फिटनेस फॉर्म्युला..."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article