-->
पहेला येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत तालुकास्तरीय कृषी ताईंचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न.

पहेला येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत तालुकास्तरीय कृषी ताईंचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न.


 • तालुका कृषी अधिकारी नामदेव काशीद यांच्याशी पी एम किसान निधी संदर्भात पत्रकार संजीव भांबोरे यांनी केलेली बातचीत.


संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- तालुक्यातील पहेला येथील तालुका बीजगुणण प्रक्षेत्राच्या प्रशिक्षण सभागृहामध्ये भंडारा तालुकास्तरीय एक दिवसीय कृषी ताईचे प्रशिक्षण घेण्यात आले. प्रशिक्षण मध्ये माती परीक्षण, बियाण्यांची निवड ,बियाणे बीज प्रक्रिया, किटक नाशकांचा वापर, करताना घ्यावयाची काळजी, सेंद्रिय शेती अंतर्गत जीवामृत, बिजामृत, लघु प्रयोग, रासायनिक खत वापर, आरोग्य पत्रिकेद्वारे करावे तसेच येणाऱ्या खरीप हंगामात भात पिक ,व तुर पिक व्यवस्थापन या विषयावर कृषी ताईंना मार्गदर्शन प्रशिक्षणामध्ये देण्यात आले. प्रशिक्षण शिबिराला नामदेव काशीद तालुका कृषी अधिकारी भंडारा , अशोक जिभकाटे मंडळ कृषी अधिकारी पहेला, गणेश शेंडे उपकृषी अधिकारी यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता सहाय्यक कृषी अधिकारी जी पी रणदिवे,डी वाय हातेल, देवानंद जवंजाळ, रोशन भोयर, श्रुतिका हटवार ,कु. मानकर, जी एम मलेवार, अरुणा उराडे ,श्रुतिका हटवार, वैशाली सोनवणे ,गजानन गाढवे, व इतर सहायक कृषी अधिकारी व समूह सहाय्यक उपस्थित होते. सदर कार्यक्रमात कृषी अधिकारी अशोक जिभकाटे यांनी प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस पत्रकार संजीव भांबोरे यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला. यावेळी भंडारा तालुक्यातील कृषी ताई भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

0 Response to "पहेला येथे नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प टप्पा दोन अंतर्गत तालुकास्तरीय कृषी ताईंचे एक दिवसीय प्रशिक्षण संपन्न."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article