-->
महानगरपालिकेत महिला दिनाचा उत्साहात जागर; महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन.

महानगरपालिकेत महिला दिनाचा उत्साहात जागर; महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन.


विजय चौडेकर 
"साप्ताहिक जनता की आवाज"  

नांदेड :- जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेच्या वतीने महिला सक्षमीकरण आणि सन्मानासाठी पालिकेच्या कै.शंकरराव चव्हाण सभागृह परिसर येथे विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या विशेष कार्यक्रमांचे उद्घाटन *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते उत्साहात पार पडले. 

यावेळी बोलताना महापौर कविता मुळे म्हणाल्या की, "स्त्री ही समाजाचा मुख्य आधारस्तंभ आहे. महिलांनी प्रत्येक क्षेत्रात आपले कर्तृत्व सिद्ध केले असून, त्यांच्या आरोग्याची आणि आर्थिक स्वावलंबनाची जबाबदारी पालिकेच्या वतीने समर्थपणे पार पाडली जाईल. सर्व महिलांनी कर्तबगार महिलांचे जीवन चरित्र डोळ्यासमोर ठेवून आपले आयुष्य समृद्ध करावे असे प्रतिपादन केले. नांदेड शहराच्या विकासाचा संकल्प पूर्ण करण्यासाठी सर्व महिलांनी त्यांना सहकार्य करावे असे आवाहन केले.

याप्रसंगी महापालिका महिला कर्मचारी व महिला सदस्यांसाठी महिला सक्षमीकरण विषयावर *श्रीमती आशा पैठणे* यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. यावेळी *अतिरिक्त आयुक्त निलेश सुंकेवार* यांच्या प्रमुख उपस्थितीत नवनिर्वाचित पालिका महिला सदस्यांना *महापौर सौ.कविता संतोष मुळे* यांच्या हस्ते शाल,पुष्प, पुस्तक, व झाडाचे रोपटे भेटवस्तू स्वरूपात देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी क्रीडा स्पर्धेतील विजेत्या महिलांना सुद्धा महापौरांच्या हस्ते भेटवस्तू देऊन सन्मानित करण्यात आले. या कार्यक्रमासाठी मोठ्या प्रमाणात महापालिकेच्या महिला सदस्यांची व मनपाच्या महिला कर्मचाऱ्यांची उपस्थिती होती. सदर कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी महानगरपालिकेच्या समाज विकास शाखेने विशेष परिश्रम घेतला

0 Response to "महानगरपालिकेत महिला दिनाचा उत्साहात जागर; महापौर कविता संतोष मुळे यांच्या हस्ते विविध उपक्रमांचे उद्घाटन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article