-->
​सावधान! मोहफूल वेचताना हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची भीती..

​सावधान! मोहफूल वेचताना हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची भीती..



  • लाखांदूरचे वनपरीक्षेत्रधिकारी प्रदीप चन्ने यांचे सतर्कतेचे आवाहन.

​नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

लाखांदूर :- सध्या उन्हाळ्याची चाहूल लागताच ग्रामीण भागात आणि जंगल परिसरात मोहफुलांचा हंगाम सुरू झाला आहे. मोहफूल वेचण्यासाठी ग्रामीण भागातील नागरिक पहाटेच्या सुमारास शेत शिवार आणि जंगल गाठत आहेत. मात्र, लाखांदूर तालुका हा वनसंपदेने नटलेला असून या जंगलात वाघ, बिबट्या, अस्वल यांसारख्या हिंस्त्र प्राण्यांचा मोठा वावर आहे. त्यामुळे मोहफूल वेचण्याच्या नादात स्वतःच्या जीवाला धोका निर्माण करू नका, असे आवाहन वनविभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
​लाखांदूर तालुक्यातील बहुतांश ग्रामीण कुटुंबांचा उदरनिर्वाह हा वनोपजावर अवलंबून आहे. मोहफूल गोळा करणे आणि त्यानंतर सुरू होणारी तेंदूपत्ता संकलन ही कामे मजुरांसाठी रोजगाराचे मुख्य साधन ठरतात. अधिक प्रमाणात मोहफुले मिळावीत या उद्देशाने अनेक मजूर पहाटे अंधारातच जंगलाच्या दिशेने निघतात. मात्र, पहाटेची हीच वेळ वन्यप्राण्यांच्या भ्रमंतीची असते. झुंजूमुंजू प्रकाशात मानवी हालचालींमुळे वन्यप्राणी बिथरण्याची शक्यता असते, ज्यातून हल्ल्याच्या घटना घडू शकतात.लाखांदूर 
​वन अधिकाऱ्यांनी नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी काही महत्त्वाच्या सूचना दिल्या आहेत यात 
​ जंगलात किंवा शेत शिवारात जाताना नेहमी गटाने जावे.
 पहाटे अंधारात न जाता सूर्योदय झाल्यानंतरच घराबाहेर पडावे. सोबत टॉर्च किंवा काठी ठेवणे आवश्यक आहे.झाडाखाली वाकून मोहफूल वेचताना आपली मान खाली असते, ज्यामुळे प्राण्याला आपण भक्ष्य वाटू शकतो. अशा वेळी आपसात गप्पा मारा किंवा मोबाईलवर गाणी लावा, जेणेकरून आवाजामुळे प्राणी जवळ येणार नाहीत. झाडाखाली जाण्यापूर्वी आजूबाजूला वाघ किंवा बिबट्याच्या पाऊलखुणा किंवा हालचाल तर नाही ना, याची खात्री करून घ्यावी.
​"मोहफूल आणि तेंदूपत्ता संकलनातून मजुरांना नक्कीच आर्थिक आधार मिळतो, पण हे करत असताना स्वतःच्या सुरक्षेला प्राधान्य द्यावे. मोहफूल मिळविण्याच्या नादात कोणत्याही प्रकारचे धाडस किंवा कृत्य करू नका ज्यामुळे जीवाला धोका निर्माण होईल," असे आवाहन लाखांदूरचे वनपरीक्षेत्राधिकारी प्रदीप चन्ने यांच्या वतीने करण्यात आले आहे.


0 Response to "​सावधान! मोहफूल वेचताना हिंस्त्र प्राण्यांच्या हल्ल्याची भीती.."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article