-->
पहेला येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन.

पहेला येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन.



कुलदिप गंधे 
"साप्ताहिक जनता की आवाज"  
         

पहेला :- दिनांक ८ मार्च २०२६ रोजी रविवार ला दुपारी ३.०० ते ७.०० या वेळेत श्री हनुमान मंदिर पहेला परिसरात विशाल हिंदू संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या कार्यक्रमाचे आयोजन परिसरातील विविध सामाजिक व धार्मिक संस्थांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले आहे.
या संमेलनामध्ये संत महात्म्यांचे आशीर्वचन, वक्त्यांचे मार्गदर्शन, भजन व सांस्कृतिक कार्यक्रम, गोमाता व भारतमाता पूजन तसेच भारतमाता आरती यांसारखे विविध कार्यक्रम होणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे.
या कार्यक्रमाला परिसरातील सर्व हिंदू बांधवांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

0 Response to "पहेला येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article